Tarun Bharat

‘हत्ती’ व इतर ‘जंगली प्राण्यां’चा वावर..!

Advertisements

खानापूर : नागरगाळी परिसरातील जंगलात हत्ती व इतर जंगली प्राण्यांचा वावर पूर्वीपासूनच आहे. दरवर्षी या भागात हत्ती येत असतात. या भागातील तारवाड, कोडगई, नागरगाळी, कु़भार्डा या भागात भात पीक मोठ्या प्रमाणात असल्याने ते भाताच्या सुगीच्या हंगामापर्यंत या भागात वास्तव्य करून असतात. यानंतर हे हत्ती इतरत्र जातात रविवार व सोमवार दोन दिवसात या हत्तीने नागरगाळी, कुंभार्डा, कोडगई, तारवाड या भागात शेतकऱ्यांच्या भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.

या भागातील शेतकरी सुनील प्रभू, बाळु रामगणणा या शेतकऱ्यांशी संपर्क साधला असता, ते म्हणाले वन खाते येथे येऊन पिकाची पाहणी करून जाते. दिवाळीनंतर या सर्वच पिकांची नुकसान भरपाई देतात. तसेच या भागात घनदाट जंगल असल्याने इतर जंगली प्राणी ही मोठ्या प्रमाणात आहेत. दरवर्षी अशाच प्रकारे नुकसान करत असल्याने आम्ही या भागातील शेतकरी अनेक नुकसानीला तोंड देत असून याबाबत वन खातेही हतबल असल्याचे त्यांनी सांगितले.

नागरगाळी वलयाचे वनाधिकारी रत्नाकर दिलेल्या माहितीनुसार, या भागात हत्तींचे वास्तव्य कायमच असून भात पीक मोठ्या प्रमाणात असल्याने जेव्हा या भात पिकाची सुगी संपल्यानंतर या भागातील हत्ती इतरत्र जातात. नुकसान झालेल्या पिकांचा ऑनलाईन सर्वे केला जातो. काही मोजक्या कागदपत्रांची पूर्तता केल्यावर ही नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येते.

Related Stories

कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी आता मोबाईल ऑक्सिजन बससेवा

Amit Kulkarni

बेळगावला रोखत मंगळूर अंतिम फेरीत

Amit Kulkarni

सरकारी नोकरी न मिळाल्याने तरुणाची आत्महत्या

Omkar B

रणकुंडये हायस्कूलच्या व्हॉलीबॉल संघाची निवड

Amit Kulkarni

बळ्ळारी नाल्याची खोदाई आता उद्योग खात्रीतून

Patil_p

संकेश्वरात टास्कफोर्स कमिटीची स्थापना

Patil_p
error: Content is protected !!