ग्रामसभेत प्रथा बंद करण्यासाठी घेण्यात आली शपथ,
आचरा /प्रतिनिधी-
शासन आदेशानुसार विधवा प्रथा बंद करण्यासाठी आचरा ग्रामपंचायतीत महिला एकवटत हि प्रथा कायमची बंद करून विधवा महिलेला समाजात सन्मानाची वागणूक मिळण्यासाठी कटीबद्ध असल्याची शपथ या ग्रामसभेत उपस्थित सर्वांनी घेतली. उपस्थित विधवा महिलेने मंगळसूत्र घालून येत हि प्रथा बंदसाठी महिलांचाच पुढाकार असल्याचे दाखवून दिले.
आचरा ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच प्रणया टेमकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी त्यांच्या सोबत उपसरपंच पाडूरंग वायंगणकर, माजी सरपंच राजन गांवकर, माजी सरपंच मंगेश टेमकर, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी प्रकाश कदम, तलाठी अनिल काळे, ग्रामस्थ जयप्रकाश परुळेकर, वामन आचरेकर, जेष्ठ नागरिक संघाचे अशोक कांबळी, जँकलीन फर्नांडिस तसेच बहुसंख्येने महिला आदी उपस्थित होत्या.