Tarun Bharat

विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱयांचा एल्गार

जिल्हाधिकाऱयांना मोर्चाद्वारे निवेदन

प्रतिनिधी /बेळगाव

अंगणवाडी कर्मचारी महिलांना सर्वोच्च न्यायालयाने ग्रॅच्युटी देण्याचे आदेश दिले आहेत. याचबरोबर निवृत्तीनंतर पेन्शनही देण्याचे आदेश दिले असताना अद्याप याबाबत सरकारने पाऊल उचलले नाही. याचबरोबर इतर मागण्यांसाठी अंगणवाडी ववर्स ऍण्ड हेल्पर्स फेडरेशनच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.

अंगणवाडीला एलकेजी, युकेजी जोडावेत. कोरोनाकाळात कोरोना योद्धा म्हणून काम करताना ज्या अंगणवाडी कर्मचाऱयांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, निवृत्त होणाऱयांना तातडीने रक्कम अदा करावी, गेल्या अनेक वर्षांपासून अनेक कर्मचारी महिला निवृत्त झाल्या आहेत. मात्र त्यांना अजूनही रक्कम देण्यात आली नाही. तेव्हा त्यांचा सारासार विचार करुन या सर्व मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

2-3 हजार रुपये भत्ता द्यावा

निवडणूक काळात काम करण्यासाठी या कर्मचाऱयांना जुंपले जाते. विविध कामांसाठी मोबाईल दिला जातो. मात्र, त्यामध्ये रिचार्ज केला जात नाही. निवडणूक काळात किंवा इतर कामे करताना किमान दरमहा 2 ते 3 हजार रुपये भत्ता द्यावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

 महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ऍड. नागेश सातेरी, सुजाता बेळगावकर, वाय. बी. शिग्गीहळ्ळी, मिनाक्षी कोटगी यांच्यासह मोठय़ा संख्येने महिला उपस्थित होत्या.

Related Stories

एपीएमसीत कांदा दरात मोठी घसरण

Amit Kulkarni

जाहिरात फलकांच्या कारवाईला कंत्राटदारांचा आक्षेप

Amit Kulkarni

पुतळा उभारणीवरून पिरनवाडीत तणाव

Patil_p

पार्किंग रोखण्यासाठी दगडांचा आधार

Amit Kulkarni

चिखलाच्या डबक्यातून परिवहनचा प्रवास

Amit Kulkarni

ऍड. एस. बी. शेख यांना आणखी पीएचडी

Patil_p