Tarun Bharat

थकीत बिलासाठी कल्लेहोळ कामगारांचा एल्गार

तालुका पंचायतसमोर मोर्चा काढून धरणे आंदोलन

 प्रतिनिधी/ बेळगाव

मागील दोन ते तीन वर्षांपासून कल्लेहोळ (ता. बेळगाव) येथे उद्योग खात्री योजनेतून कामे करण्यात आली होती. मात्र त्या कामाची बिले अजूनही देण्यात आली नाहीत. त्यामुळे अनेक कामगारांचे वेतन थकले आहे. परिणामी यासाठी वारंवार तक्रार, निवेदने देण्यात आली. मात्र अधिकाऱयांनी सोयीस्कर दुर्लक्ष केल्यामुळे शनिवारी कल्लेहोळ येथील उद्योग खात्रीतील कामगारांनी तालुका पंचायतवर भव्य मोर्चा काढून तातडीने बिले देण्याची मागणी केली.

सुळगा ग्राम पंचायत हद्दीमध्ये असणाऱया कल्लेहोळ ग्राम पंचायतीमध्ये उद्योग खात्री योजनेतून नाल्याचे काम केले होते. कामगारांना काम देण्याच्या हेतूने आराखडा तयार न करताच काम देण्यात आले. त्यानंतर ते काम पूर्ण झाले. मात्र त्याचे वेतन न आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान एनएमआरमध्ये चार बिले होती. त्यामधील दोन बिले थकीत ठेवण्यात आली. परिणामी कामगारांचे वेतन न झाल्याने त्यांना कारणे सांगून वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

दरम्यान, याबाबत तालुका पंचायत माजी सदस्य सुनील अष्टेकर यांनी तालुका पंचायतच्या अधिकाऱयांना वारंवार वेतन देण्याची मागणी केली. मात्र त्याकडे गांभीर्याने न घेता ती बिले थकीत ठेवण्यात आली. अजूनही 15 ते 16 लाख रुपये बिले करण्याचे बाकी असल्याने संताप व्यक्त करण्यात आला. त्यामुळे कल्लेहोळ येथील कामगारांनी शनिवारी मोर्चा काढून ठिय्या आंदोलन छेडले. कामगारांनी आंदोलन छेडताच अधिकाऱयांच्या नाकीनऊ आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

सुमारे 400 ते 500 महिलांनी हे आंदोलन छेडले. दरम्यान अधिकाऱयांशी चर्चा केली असता जुने पीडीओ आणि अभियंत्यांमुळे ही बिले थकीत राहिल्याचे सांगितले. त्यानंतर अधिकाऱयांना धारेवर धरताच त्यांनी तातडीने पहिल्या टप्प्यात 7 ते 8 लाखांचे बिल मंजूर करू व उर्वरित बिल पुढील शनिवारी करू, असे आश्वासन दिले. त्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. परिणामी शनिवारपर्यंत हे बिल झाले नाही तर पुन्हा मोठय़ा प्रमाणात आंदोलन छेडू, असा इशाराही कामगारांनी दिला आहे.

यावेळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनाही निवेदन देण्यात आले. यावेळी शिवाजी सुंठकर, तालुका पंचायत माजी सदस्य सुनील अष्टेकर, किसन सुंठकर, अनिल पाटील, अश्विनी खन्नुकर, रमेश खन्नुकर, महेश सुतार, लक्ष्मी नाईक, अलका लामजी, शट्टुप्पा पाटील, मारुती पाटील, दीपा तोरे, आर. के. कोलकार आदी उपस्थित होते..

Related Stories

हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे रांगोळीतून रेखाटले भावचित्र

mithun mane

रविवारी जिल्हय़ात 194 नवे रुग्ण

Patil_p

शिक्षण खाते साधणार दहावीच्या विद्यार्थ्यांशी संपर्क

Amit Kulkarni

खानापूर तालुका माजी सैनिक संघटनेची बैठक

Patil_p

सोमवारच्या महामोर्चाला पोलिसांकडून आडकाठी

Amit Kulkarni

श्रमिक अभिवृद्धी संघातर्फे नरेगा कामगारांचा मेळावा

Amit Kulkarni