जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर
कोल्हापूर प्रतिनिधी
गेल्या अनेक महीन्यांपासून ई-पॉस मशीनमधील तांत्रिक अडचणींमुळे रेशन दुकानदार व ग्राहकांमध्ये वादावादीचे प्रकार होत आहेत. त्यामुळे ई-पॉस मशिनमधील तांत्रिक अडचणी दूर कराव्यात, यासह विविध मागण्यांचे निवेदन कोल्हापूर जिल्हा रेशन दुकानदार संघटनेतर्फे जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांना देण्यात आले.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या शिष्टमंडळाने हे निवेदन सादर पेले. निवेदनातील मागण्या अशा, ई-पॉस मशीनमधील तांत्रिक अडचणींमुळे रेशन दुकानदार व ग्राहकांमध्ये वादावादीचे प्रकार होत आहेत. त्यामुळे लवकर शासनस्तरावर जलदगतीने सर्व्हरची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत, ई-पॉस मशीन दुरूस्तीसाठी ऑपरेटर नेमावेत, मशिनची बॅटरी, चार्जर व कि-पॅड नवीन बसवून मिळावे. रवींद्र मोरे यांनी रेशन धान्य दुकानदार व लाभार्थ्यांनी समन्वय ठेऊन लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
शिष्टमंडळात शहराध्यक्ष राजेश मंडलिक, अशोक सोलापूरे, गजानन हवालदार, अरुण शिंदे, पिंटू चौगुले, सुनील दावणे, दीपक चौगुले, सिंधुताई मिरजकर, सचिन चव्हाण, अनिल जंगटे, सूरेश पाटील, बाबासाहेब पाटील, केतन भोसले, अजित पाटील, राहुल दळवी, कल्याणी सूर्यवंशी, भरत शिराळे, अनिल जाधव, निवृत्ती दिवेकर, सतीश शेटे, रोहित सावेकर, बाळासाहेब भोसले, सुधीर चौगुले आदींचा समावेश होता.