ऑनलाईन टीम/तरुण भारत
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलन मस्क (Elon Musk) हे आता जगभरातील लोकप्रिय मायक्रोब्लॉगिंग सोशल मीडिया असलेल्या ट्विटरचे (Twitter) नवे मालक बनणार आहेत. तब्बल यांनी तब्बल ४४ बिलियन डॉलरमध्ये एलन मस्क यांनी Twitter Inc कंपनी खरेदी केली आहे. एलन मस्क यांनी ट्विटरला तसा खरेदी प्रस्ताव दिला होता, जो ट्विटरच्या बोर्डाने स्वीकारला आहे. एलॉन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरमध्ये ९ टक्के हिस्सेदारी विकत घेतली होती. आता मस्क यांनी ट्विटर इंकचा १०० टक्के हिस्सा विकत घेतला आहे. त्यांनी ट्विटर कंपनी $54.20 प्रति शेअर या दराने विकत घेतली आहे
दरम्यान, काही दिवसांपूर्वी एलन मस्क यांनी ट्विटरची ९ टक्के हिस्सेदारी खरेदी केली होती. समभाग खरेदी केल्यानंतर “ट्विटरमध्ये प्रचंड क्षमता आहे. मी याला मुक्त करण्यासाठी कंपनी आणि यूजर्सच्या कम्युनिटीसोबत काम करण्यास उत्सुक आहे,’ असं ट्विट एलन मस्क यांनी केलं होतं. त्यानंतर काही दिवसांपासून एलन मस्क आणि ट्विटरच्या संचालक बोर्डामध्ये चर्चा सुरू होती.
एलन मस्क आता ट्विटरचे नवे मालक असणार आहेत. एलन मस्क यांनी ४४ बिलियन डॉलरमध्ये ट्विटर खरेदी केलं आहे. ट्विटरच्या मंडळाने एलन मस्कचा प्रस्ताव मंजूर केला. ही खरेदी प्रक्रिया चालू वर्षातच पुर्ण केली जाणार आहे. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर ट्विटर खासगी कंपनी होईल आणि एलन मस्कच्या हाती तिची सूत्रे येतील.