तरुण भारत

ट्विटर खरेदी करार स्थगित – एलन मस्क

ऑनलाईन टीम/तरुण भारत

जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आणि इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे सीईओ एलन मस्क (Elon Musk CEO of Tesla Motors) मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट ट्विटर विकत घेणार असल्याची चर्चा बरेच दिवस रंगली. पण ट्विटर विकत घेण्याचा व्यवहार तात्पुरता स्थगित केला आहे. ही माहिती मस्क यांनी स्वतः ट्विट करून दिली. याचे परिणाम शेअर मार्केटमध्येही दिसले. यामुळे शेअर्स प्रीमार्केट ट्रेडिंगमध्ये २० टक्क्यांनी घसरले आहेत.

इलन मस्क यांनी ट्विटरला ४४ अब्ज डॉलरमध्ये खरेदी करण्याचा करार केला होता, मात्र हा करार आता काही काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. इलॉन मस्क यांनी स्वतः ट्विट करीत ही माहिती दिली आहे.

मस्क यांनी ट्विटमध्ये म्हटले की, स्पॅम आणि बनावट खात्यांमुळे हा करार थांबवण्यात आला आहे. ट्विटरच्या एकूण यूजर बेसमध्ये स्पॅम किंवा बनावट खाती ५ टक्क्यांहून कमी असल्याचे आढळून येईपर्यंत हा करार थांबवण्यात आला आहे. दरम्यान, ट्विटरने अलीकडेच माहिती दिली होती की त्यांच्या प्लॅटफॉर्मवर फक्त ५ टक्के स्पॅम किंवा बनावट खाती आहेत. ट्विटर डील होल्ड केल्याची बातमी येताच कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. प्री-मार्केटमध्ये कंपनीचा शेअर ११ टक्क्यांहून अधिक घसरला आहे. त्याच वेळी टेस्लाचा शेअर्स ५ टक्क्यांनी वाढला.

मस्क यांनी हा करार स्थगित केल्याने ट्विटरच्या संचालक मंडळात गोंधळ उडाला आहे. ट्विटरने दोन कर्मचार्‍यांना काढून टाकले आहे. काढून टाकलेल्या दोन कर्मचार्‍यांमध्ये ट्विटरचे महाव्यवस्थापक कायवान बॅकूर आणि कंपनीचे महसूल आणि उत्पादन प्रमुख ब्रूस फॉक यांचा समावेश आहे.

Advertisements

Related Stories

पोटच्या मुलीचा आई-वडिलांनीच केला खून

Abhijeet Shinde

जिहादींचे समर्थन करणाऱ्या गिलानींना पाकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार

datta jadhav

जगप्रसिद्ध आयफेल टॉवर पाहण्यासाठी झाला खुला

Patil_p

गौतम गंभीरला एका आठवड्यात तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी

Abhijeet Shinde

जगातील सर्वात मोठा ससा चोरीला

Patil_p

पाकिस्तानात मिळाला 2300 वर्षे जुना खजिना

Patil_p
error: Content is protected !!