ऑनलाईन टीम / तरुण भारत :
टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक एलन मस्क यांनी मायक्रोब्लॉगिंग साईट ‘ट्विटर’सोबतचा 44 अब्ज डॉलरचा करार रद्द केल्याची घोषणा केली आहे. अनेक विनंत्या करूनही ट्विटर बनावट किंवा स्पॅम खात्यांबद्दल माहिती देऊ शकले नाही. त्यामुळे मस्क यांनी हा करार रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे मस्क यांच्या वकिलांनी सांगितले.
मस्क यांनी 44 अब्ज डॉलरला ट्विटर खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांची व्यवहाराची प्रक्रियाही सुरू झाली होती. ट्विटरवर किती बनावट हँडल आणि किती स्पॅम करणारी हँडल आहेत, याची ठोस माहिती एलन मस्क यांनी मागितली होती. पण ही माहिती देण्यात ट्विटर अयशस्वी झाले. ट्विटरने त्यांच्यासोबत केलेल्या कराराचा भंग केला. मस्क यांना चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती दिली गेली. त्यामुळे मस्क यांनी ट्विटर खरेदी करार रद्द केला.
दरम्यान, मस्क यांच्या करार रद्दच्या घोषणेमुळं शेअर बाजारातील ट्विटरच्या विश्वासार्हतेवर परिणाम झाला आहे. शेअर बाजारातील ट्विटरची पत घसरली आहे. हे नुकसान मस्क यांनी भरून द्यावं, असं ट्वटिरच्या व्यवस्थापनाचं म्हणणं आहे. तर ट्विटरचे अध्यक्ष बेट टेलर यांनी मस्क यांच्याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा : शिंदे, फडणवीस आज मोदींना भेटणार, ‘या’ विषयांवर होणार चर्चा