ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतातील ‘Elyments’ या पहिल्या सोशल मीडिया ॲपचे उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांच्या हस्ते आज लॉन्चिंग करण्यात आले.
‘Elyments’ हे ॲप 8 भाषांमध्ये उपलब्ध आहे. या ॲपमध्ये ऑडिओ, व्हिडिओ कॉलिंगचीही सुविधा देण्यात आली आहे. तसेच यूजर्सच्या डेटा सुरक्षेबाबत विशेष काळजी घेण्यात आली आहे. कंपनीच्या परवानगीशिवाय अन्य कोणालाही युजर्सची माहिती मिळू शकत नाही. त्यामुळे हे ॲप पूर्णतः सुरक्षित आहे. एक लाखाहून अधिक लोकांनी हे ॲप डाऊनलोड केले आहे.
देशात 50 कोटींहून अधिक सोशल मीडिया युजर्स आहेत. नुकतेच गलवान खोऱ्यातील भारत-चीन हिंसक संघर्षानंतर भारताने 59 चिनी ॲपवर बंदी आणली. त्यानंतर भारतात पहिल्यांदाच सोशल मीडिया ॲप तयार करण्यात आले.