Tarun Bharat

इमामी ऍग्रोटेकचे खाद्यतेल ब्रँडमधून 5,000 कोटीच्या उलाढालीचे ध्येय

नवी दिल्ली

 इमामी ऍग्रोटेक लिमिटेने आपला खाद्यतेल ब्रँड ‘हेल्दी ऍण्ड टेस्टी’ पुन्हा सादर केला आहे आणि आगामी तीन ते पाच वर्षांच्या कालावधीत या ब्रँडची उलाढाल ही जवळपास 5,000 कोटी रुपयांवर पोहचणार असल्याचे सांगितले आहे.

5 हजार कोटी रुपयांच्या उभारणीच्या प्रस्तावाला संचालक मंडळाने हिरवा कंदील दाखवला आहे. कोलकात्यात मुख्यालय असणाऱया इमामी ऍग्रोटेकने सादर केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे, की ब्रँडचा पुन्हा केलेल्या लाँचिंगचा भाग म्हणून कंपनीने मोहरी, सोयाबीन, सूर्यफूल आणि तांदूळ भूसा या चार प्रकारांना सादर केले आहे.

याशिवाय कंपनीने अभिनेत्री कॅटरिना कैफलाही सदिच्छा दूत म्हणून नियुक्त  केले आहे. इमामी ग्रुपची कंपनी इमामी ऍग्रोटेकने सांगितले की, सदरचा ब्रँड पुन्हा सादर केल्यानंतर कंपनी आगामी 5 वर्षांच्या प्रवासात मोठी झेप घेण्यासाठी आवश्यक त्या प्रयत्नांना बळ देणार आहे. इमामी ही कंपनी ग्राहकोपयोगी वस्तु, बांधकाम क्षेत्र तसेच पेपर उद्योगात कार्यरत आहे.

पारसचे अधिग्रहण

दुसरीकडे कंपनी अहमदाबाद येथील पारस फार्मास्युटीकल्स खरेदी करण्याच्या प्रयत्नात असून याकरीता अजूनही कंपनी बोलणी करत असल्याचे समजते. अजूनही हा करार होईल असाच विश्वास इमारी ऍग्रोटेकला वाटतो आहे.

Related Stories

सुक्ष्म, लघू-मध्यम उद्योगाला पॅकेज ?

Patil_p

ऍपलची नवी उत्पादने दिमाखात सादर

Patil_p

ऍमेझॉन 7शहरांमध्ये इलेक्ट्रीक वाहनाने वस्तुंचा पुरवठा करणार

Patil_p

‘एनटीपीसी’ देशातील सर्वात मोठा सोलार पार्क उभारणार

Patil_p

महागाईदरम्यान मध्यमवर्गाला अपेक्षा

Patil_p

विक्रीमधील दबावामुळे सेन्सेक्सची घसरण

Patil_p