Tarun Bharat

इयान वादळावरून फ्लोरिडात आणीबाणी

अमेरिकेच्या अध्यक्षांकडून मदत पोहोचविण्याचा आदेश

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी फ्लोरिडामध्ये आणीबाणी जाहीर केली आहे. फ्लोरिडात आलेले चक्रीवादळ इयानमुळे ही घोषणा करण्यात आली आहे.  फ्लोरिडातील नागरिकांपर्यंत लवकरात लवकर मदत पोहोचविण्याचा आदेश बिडेन यांनी दिला आहे. इयान हे चक्रीवादळ मध्य कॅरेबियन समुद्रात तयार झालेले या हंगामातील नववे चक्रीवादळ आहे. याचमुळे फ्लोरिडामध्ये आणीबाणी घोषित करावी लागली आहे.

इयान चक्रीवादळाची तीव्रता वाढल्याचा अनुमान व्यक्त करण्यात येत आहे. हे चक्रीवादळ केमॅन बेटसमुहानजीकहून पुढे सरकले आहे. चक्रीवादळ आता 4 ग्रेडचे चक्रीवादळ ठरण्याचा अनुमान आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर फ्लोरिडातील सर्व रहिवाशांना तयारी करून ठेवण्यास सांगण्यात आले आहे. या चक्रीवादळाचे संभाव्य परिणाम पडताळून पाहण्यासाठी प्रांतीय तसेच स्थानिक प्रशासनासोबत समन्वय साधला जात आहे.

पुर्तो रिकोमध्येही आणीबाणी

यापूर्वी पुर्तो रिकोमध्येही आणीबाणी लागू करण्यात आली होती. तेथे फियोना चक्रीवादळामुळे धोका निर्माण झाला होता. याचबरोबर फिलिपाईन्सच्या दिशेने नोरू हे चक्रीवादळ पुढे सरकरत आहे. फिलिपाईन्समध्ये राजधानी मनीला समवेत अनेक भागांमधील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. नोरू हे कॅटेगरी 5 मधील चक्रीवादळ असल्याचे सांगण्यात येते.

Related Stories

हाँगकाँगवर कब्जा करण्याचा चीनचा मार्ग मोकळा

datta jadhav

70 हजार वर्षांनंतर येणार रहस्यमय धूमकेतू

Patil_p

मास्क लावायला सांगितलं म्हणून…

Amit Kulkarni

पाकच्या लष्करी मुख्यालयाजवळ बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू

datta jadhav

आयर्लंडकडून व्हॉटस्ऍपवर नियमभंगाबद्दल दंड आकारणी

Patil_p

पाकिस्तानी रुपयामध्ये सर्वात मोठी घसरण

Patil_p