गुवाहाटी / वृत्तसंस्था
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विमानाचे गुवाहाटी येथे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. आगरतळा येथे जात असताना खराब हवामानामुळे विमान तेथे उतरवण्यासाठी सिग्नल मिळत नव्हता. त्यानंतर गुवाहाटी येथील लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उतरवण्यात आले. त्यानंतर शहा गुवाहाटी येथील हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये थांबले. तेथून पुढे ते आगरतळय़ाला रवाना झाले. भाजपच्या यात्रेला हिरवा झेंडा दाखवण्याच्या निमित्ताने ते आगरतळा दौऱयावर जात होते. राज्यात यंदा निवडणुका होणार असल्याने ईशान्य भारतात भाजप नेत्यांचे दौरे वाढले आहेत.