दिल्लीहून गुवाहाटीला जाणाऱया विमानाच्या विंडशील्डला तडे
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीहून गुवाहाटीला जाणाऱया गो-एअर कंपनीच्या विमानाचे बुधवारी जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानाचे विंडशील्ड हवेतच फुटल्यानंतर विमान जयपूरकडे वळवण्यात आल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाकडून देण्यात आली. यापूर्वी गो-एअरची दोन विमाने इंजिनमध्ये बिघाड आणि इतर तांत्रिक समस्यांमुळे वळवण्यात आली होती. त्याचवेळी धावपट्टीवर कुत्रा आल्याने लेहहून दिल्लीला जाणारे गो-एअरचे विमान उड्डाण करू शकले नव्हते.