Tarun Bharat

योगींच्या हेलिकॉप्टरचे वाराणसीत इमर्जन्सी लँडिंग

Advertisements

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

आज सकाळी वाराणसीहून लखनऊला जाताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हेलिकॉप्टरवर एक पक्षी आदळला. अपघाताची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हेलिकॉप्टरचे लँडिंग करण्याचे आदेश दिल्यानंतर पायलटने वाराणसीत इमर्जन्सी लँडिंग केले. योगी आदित्यनाथ पूर्णपणे सुरक्षित आहेत.

योगी वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी 9.10 मिनिटांनी ते वाराणसी पोलीस लाईन येथून हेलिकॉप्टरने लखनऊला रवाना झाले. त्यानंतर काहीच वेळात एका पक्ष्याने त्यांच्या हेलिकॉप्टरला धडक दिली. पायलटने 9.16 वाजता पोलीस लाईनमध्येच हेलिकॉप्टरचे सुरक्षित लँडिंग केले. हेलिकॉप्टरमधील कोणालाही दुखापत झाली नसून, सर्वजन सुरक्षित आहेत.

हेलिकॉप्टर प्रोटोकॉलनुसार, जेव्हा अशा प्रकारची घटना घडते. तेव्हा हेलिकॉप्टरचे लँडिंग केले जाते. त्यानंतर तांत्रिक पथक हेलिकॉप्टरची तपासणी करते. जोपर्यंत सर्व काही ठीक आहे याची खात्री होत नाही, तोपर्यंत व्हीआयपी हेलिकॉप्टरला उड्डाण करण्यास परवानगी दिली जात नाही.

Related Stories

आसाममध्ये पूरस्थिती गंभीर; मागील २४ तासात ८ जणांचा मृत्यू

Abhijeet Shinde

ऐतिहासिक ‘मशाल रिले’ला १९ जूनला प्रारंभ

Nilkanth Sonar

पुणे विभागात ३८० स्टेशन मास्तर जाणार सामूहिक रजेवर

Abhijeet Shinde

राष्ट्रपती निवडणुकीत खासदारांच्या मताचे मूल्य घटणार

Patil_p

”सर्वाधिक लसी महाराष्ट्राला दिल्या, तरीही लसींचा पुरवठा होत नाही अशी राज्य सरकारची तक्रार”

Abhijeet Shinde

कोरोना योध्यांचे विमा कवच बंद

datta jadhav
error: Content is protected !!