1500 फुटांच्या उंचीवर धडकला पक्षी ः मोठी दुर्घटना टळली
वृत्तसंस्था/ वाराणसी
उत्तरप्रदेशच्या वाराणसीमध्ये रविवारी सकाळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हेलिकॉप्रटचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. 1500 फुटांच्या उंचीवर योगी आदित्यनाथ यांच्या हेलिकॉप्टरला पक्षी धडकला होता. परंतु वैमानिकाच्या प्रसंगावधानपणामुळे एक मोठी दुर्घटना टळली आहे.
वैमानिकाने बर्ड हिटनंतर हेलिकॉप्टरला खबरदारीदाखल एका मैदानात उतरविले आहे. यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मैदानातून शासकीय विश्रामगृहात परतावे लागले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री योगी हे रस्तेमार्गाने लालबहादुर शास्त्राr आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. तेथून विमानाद्वारे ते लखनौसाठी रवाना झाले. या घटनेनंतर हेलिकॉप्टरमध्ये कुठल्याही प्रकारचा बिघाड झाला आहे का हे तंत्रज्ञ पडताळून पाहणार आहेत.
योगी आदित्यनाथ यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग झाल्यावर पोलीस आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शनिवारी संध्याकाळी दोन दिवसीय दौऱयानिमित्त वाराणसीत पोहोचले होते. जुलै महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाराणसी दौरा प्रस्तावित आहे. मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन होणाऱया प्रकल्पांची माहिती घेत कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेतला आहे.