कोसळणाऱया दरडांवर देणार बारकाईने लक्ष
प्रतिनिधी /वाळपई
पावसाळी हंगामात गोवा कर्नाटक दरम्यानच्या चोर्ला घाट परिसरातील महामार्गावर कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी विशेष दखल घेण्यात येणार आहे. आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाली असून आडकाठी निर्माण झाल्यास त्या संदर्भात ताबडतोब उपाययोजना करण्यात येणार आहेत. याकडे राष्ट्रीय महामार्गावरील गोवा विभाग यासंदर्भात बारकाईने लक्ष देत असून या महामार्गावरून प्रवास करणाऱया प्रवाशांनी व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पावसाळय़ात सांखळी ते बेळगाव हा चोर्ला मार्ग रस्त्यावर वारंवारपणे दरडी कोसळून वाहतुकीत निर्माण होण्याचे प्रकार घडतात. यामुळे प्रवाशांचे मोठय़ा प्रमाणात हाल होत असतात. गेल्या वषी अनेकवेळा दरडी कोसळल्यामुळे वाहतूक मोठय़ा प्रमाणात ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागले होते.
त्यावेळी संबंधित खात्याने दखल घेऊन रस्ता वाहतुकीस मोकळा केला होता. यंदाही तशी व्यवस्था केली आहे. तसा प्रकार घडल्यास यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. या संदर्भात प्रस्ताव येणाऱया दोन दिवसात मंजूर होणार आहे. याबाबत बारकाईने लक्ष देण्यात येईल, अधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे.
खासकरून घाट परिसरामध्ये वारंवार दरडी कोसळत असतात. या भागामध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस लागत असतो. यामुळे दरडी कोसळून माती रस्त्यावर पसरलेली असते. दोन्ही बाजूची वाहतूक मोठय़ा प्रमाणात ठप्प होत असते. यामुळे सातत्याने नागरिकांना व प्रवाशांना त्रास होत असतो.
गेल्या वषीप्रमाणे यंदाही अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे, असे यावेळी अधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे.
सांखळी ते बेळगाव सुमारे 12 किलोमीटरचा रस्ता पूर्ण पणे घाट परिसरातून जात असतो. यामुळे वारंवार दरडी, मोठी झाडे कोसळून वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडतात. गोवा-बेळगाव दरम्यानची वाहतूक गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वाढत आहे. गोव्यातील जनता मोठय़ा प्रमाणात बेळगाव भागांमध्ये खरेदीसाठी जात असतात. यामुळे हा रस्ता प्रवासासाठी जवळचा व सोयिस्कर असल्यामुळे या मार्गावर वाहतुकीची नेहमीच वर्दळ असते. गोवा हद्दीत सरकारने रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण केले आहे. यामुळे हा रस्ता चांगला झाला आहे. गोवा हद्दीपर्यंत हा रस्ता चांगल्या अवस्थेत आहे?. मात्र कर्नाटक हद्दीमध्ये या रस्त्याची वाताहत होताना दिसत आहे. त्यामुळे कर्नाटक हद्दीतील प्रवास मात्र डोकेदुखीचा ठरणार आहे.