बेन एन्यूरिजमला तोंड देतेय मदर ऑफ ड्रगन
हॉलिवूड अभिनेत्री एमिलिया क्लार्क बेन एन्यूरिजम (एकप्रकारचा मेंदूचा आजार) नावाच्या आजाराला तोंड देत आहे. या आजारामुळे तिच्या शरीरातील अनेक अवयवांचे नुकसान झाले आहे. गेम ऑफ थ्रोन्सच्या चित्रिकरणादरम्यान ब्रेन सर्जरी करविली होती असे तिने सांगितले आहे.
एमिलियाला तिची जगप्रसिद्ध सीरिज गेम ऑफ थ्रोन्ससाठी ओळखले जाते. यात तिने ‘मदर ऑफ ड्रगन’ची भूमिका साकारली होती. ब्रेन सर्जरीनंतर माझे जीवन पूर्णपणे बदलले आहे. शस्त्रक्रियेनंतर माझ्या मेंदूतील एक हिस्सा गायब झाल्यासारखे वाटू लागते. परंतु चांगली गोष्ट ही आहे की मी संभाषण करू शकते असे तिने म्हटले आहे.
मी माझे आयुष्य वेगळय़ा प्रकारे जगत आहे. अनेक लोक या आजाराला तोंड देत जग तआहेत. या समस्येनंतरही मी चांगल्याप्रकारे काम करत आहे. स्वतःचे संवाद न विसरता चित्रिकरण करत असल्याचे एमिलियाने सांगितले आहे.
ब्रेन एन्यूरिजमने पीडित व्यक्तीच्या मेंदूतील रक्तवाहिन्या कमजोर होतात. अशा व्यक्तींना उच्च रक्तदाब, आनुवांशिक आजार, संक्रमण किंवा मेंदूत ईजा इत्यादी गोष्टींना सामोरे जावे लागू शकते. तीव्र डोकेदुखी, हातपाय बधीर होणे, थकवा आणि चक्कर येणे ही याची लक्षणे आहेत.