पतीवर केला होता फसवणुकीचा आरोप
अमेरिकन मॉडेल आणि अभिनेत्री एमिली रतकोवस्की स्वतःचा पती सबेस्टियन बेयर-मॅकलार्डसोबतचा स्वतःचा 4 वर्षे जुना विवाह संपुष्टात आणणार आहे. मागील आठवडय़ातच एमिलीने स्वतःच्या पतीवर विश्वासघाताचा आरोप केला होता. त्यानंतर दोघांच्या घटस्फोटाचे वृत्त पसरले होते. तर एमिली काही छायाचित्रांमध्ये वेडिंग रिंगशिवाय दिसून आली होती.
पतीला घटस्फोट देण्याचा निर्णय एमिलीने पूर्वीच घेतला होता असे तिच्या मित्रांचे सांगणे आहे. एमिली आणि सबेस्टियनने पुत्र सिल्वेस्टर अपोलोच्या जन्माच्या एक वर्षातच स्वतःचे लॉस एंजिलिसमधील घर सुमारे 15 कोटी रुपयांमध्ये विकले होते. तर जून महिन्यात एमिली आणि सबेस्टियन हे सुटी व्यतित करण्यासाठी इटलीत गेले होते.
मागील आठवडय़ात एमिली ही पॅरिसमधील एका फॅशन शोमध्ये दिसून आली होती. सबेस्टियनने एमिलीची फसवणूक केली असल्याचे तिच्या एका मित्राने सांगितले. 23 फेब्रुवारी 2018 रोजी एमिलीने सोशल मीडियावर सबेस्टियनसोबत विवाह केल्याची घोषणा केली होती. त्यानंतर 8 मार्च 2021 रोजी एमिली आणि सबेस्टियन यांना पुत्ररत्न प्राप्त झाले होते. घटस्फोटाप्रकरणी एमिली तसेच सबेस्टियनने अधिकृतपणे कुठलीच घोषणा अद्याप केलेली नाही.