Tarun Bharat

फ्रान्समध्ये पुन्हा ‘मॅक्रॉन’ सरकार

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई :

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (emmanuel macron) यांनी पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. मॅक्रॉन यांनी विरोधी नेत्या मरीन ले पेन (Marine Le Pen) यांना मोठय़ा फरकाने पराभूत केले असून, ते आता दुसऱ्यांदा फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष पदावर विराजमान होणार आहेत.

फ्रान्समध्ये रविवारी राष्ट्राध्यक्षपदासाठी दुसऱया टप्प्यातील मतदान पार पडले हेते. या निवडणुकीचा निकाल आज सकाळी जाहीर झाला. त्यामध्ये इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. मॅक्रॉन यांना 58 टक्के मते मिळाली. तर त्यांच्या विरोधी नेत्या पेन यांना 42 टक्के मते मिळाली. मरीन ले पेन यांनी रविवारी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतच आपला पराभव स्वीकारला होता.
मागील निवडणुकीत देखील मॅक्रॉन यांनी पेन यांचा पराभव केला होता. निवडणूक पूर्व सर्वेक्षणामध्ये फ्रान्सच्या जनतेचा कौल मॅक्रॉन यांच्या बाजूने असल्याचं स्पष्ट झालं होतं. मॅक्रॉन यांनी कोरोना कालावधीत केलेलं काम, युक्रेन युद्धासंदर्भातील भूमिका आणि जागतिक स्तरावरील संघटनेंसोबत ठेवलेले संबंध या सर्व गोष्टींच्या आधारे त्यांच्या बाजूने मतदान झाल्याचं सांगण्यात येतं.

दरम्यान, या ऐतिहासिक विजयानंतर इमॅन्युएल मॅक्रॉन, पत्नी ब्रिजिट आणि त्यांच्या मुलांसह, आयफेल टॉवरजवळील चॅम्प डी मार्सवर सजवलेल्या मंचावर पोहोचले. यानंतर जनतेला करताना ते म्हणाले, मला एक निष्पक्ष समाज हवा आहे. जिथे पुरुष आणि महिलांमध्ये समानता असेल. आगामी वर्ष कठीण असतील. मात्र, ती ऐतिहासिक असतील. नव्या पीढीसाठी सोबत येऊन काम करावे लागेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अभिनंदन

इमॅन्युएल मॅक्रॉन यांची फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले. मोदींनी ट्विट करून लिहिले की, “भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी एकत्र काम करत राहण्यास मी उत्सुक आहे.”

Related Stories

भारतात होणार ‘स्पुटनिक व्ही’ लसीचे उत्पादन

datta jadhav

देशात ‘आंदोलनजीवी’ जमातीचा उदय, जनतेनं सावध रहावं : पंतप्रधान

Abhijeet Shinde

इस्लामाबाद चलो…इम्रान खान यांची शक्तिप्रदर्शनाची घोषणा

Patil_p

कर्जासाठी पाकिस्तानवर जिन्नांचे पार्क गहाण ठेवण्याची वेळ

datta jadhav

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरण आणि कृषी कायद्यांविरोधात काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन

datta jadhav

अजित पवार यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द

Abhijeet Shinde
error: Content is protected !!