धूम्रपान करताना दर्शविण्यात आली देवता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चित्रपटनिर्मात्या लीना मणिमेकलाई यांनी स्वतःचा माहितीपट ‘काली’चे पोस्टर प्रदर्शित केले आहे. या पोस्टरवर हिंदू देवतेला धूम्रपान करताना दाखविण्यात आले आहे. 2 जुलै रोजी पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर लोकांकडून संताप व्यक्त होतोय. सोशल मीडियावर युजर्सनी निर्मात्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे.


या पोस्टरमध्ये हिंदू देवतेच्या एका हातात त्रिशूळ तर दुसऱया हातात एलजीबीटीक्यूचा झेंडा दाखविण्यात आल्याने वाद अधिकच वाढला आहे. दररोज आमच्या धर्माच्या भावना दुखावल्या जात असल्याचे एका युजरने म्हटले आहे. युजर्सनी गृह मंत्रालयापासून पीएमओला टॅग करत लीना यांना अटक करण्याची मागणी केली आहे. वादग्रस्त माहितीपट तमिळ आर्ट कलेक्टिव्ह आणि क्वीन समर इन्स्टीटय़ूटने मिळून तयार केला आहे.