Tarun Bharat

हरित गोव्यासाठी सौरीकरणावर भर

इंडियन ऑईल गोव्यात उभारणार चार्चिंज स्टेशन्स : पर्यावरण सुरक्षेसाठी इलेक्ट्रिक गाडय़ांचा वापर योग्य

प्रतिनिधी /पणजी

इंडियन ऑईल ही भारतीयांसाठी महत्त्वपूर्ण ठरलेली विश्वासार्ह पेट्रोलियम कंपनी असून, ग्राहकांना उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी आता गोव्यातही सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पात वीजनिर्मिती करून  गोव्यातील महत्त्वाच्या चार ठिकाणी इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांसाठी चार्चिंज स्टेशन उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती इंडियन ऑईल महाराष्ट्र शाखेचे संचालक अनिर्बन घोष यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला इंडियन ऑईलचे उपसंचालक सुरेश अय्यर, पुणे शाखेचे विक्री अधिकारी भाविन राडिया, महाराष्ट्र शाखेचे व्यवस्थापक संजय समवाळ, गोवा शाखेचे विक्री अधिकारी सुनील कांता महाराणा उपस्थित होते.

गोव्याला पर्यावरणदृष्टय़ा फार महत्त्व

गोव्याला पर्यावरणदृष्टय़ा महत्त्व असल्याने येथील निसर्ग सुरक्षित राहण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करणाऱयांना सोयीचे व कोणताही त्रास होऊ नये, यासाठी इंडियन ऑईलने वीजनिर्मितीचा विचार केला असून, वास्को येथील इंडियन ऑईलच्या प्रकल्प ठिकाणी ही वीजनिर्मिती करणार असल्याचे घोष म्हणाले.

हवेतील कार्बन डाय ऑक्साईड दहा टक्क्यांनी कमी करण्याचे काम ग्रीन ल्युब्रीकंट हे इंधन फायदेशीर ठरते. ग्रीन कॉम्बो इंधन हे इंजिन ऑईल, गियर ऑईल यांचे मिश्रण आहे. ते कमी उर्त्सजनासह वाहनांची इंधन कार्यक्षमता 5.5 टक्क्यांनी वाढवते आणि त्याचा फायदा वाहनचालकांना होत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

हरित ऊर्जा प्रकल्प हाच पर्याय

वाढते प्रदूषण व त्याचे दुष्परिणाम यांचा विचार करून यावर जर मात करायची असेल तर आपल्याला हरित ऊर्जा प्रकल्पाशिवाय पर्याय नाही. हाच उद्देश डोळय़ांसमोर ठेवून इंडियन ऑईलने 2022 हे वर्ष ‘क्राफ्टींग अ ग्रीन फ्युचर’ म्हणून साजरे केले आहे. इंडियन ऑईलची किरकोळ विक्री दुकाने व इंडियन ऑईलची कार्यालये या ठिकाणी उत्तम दर्जाचे ग्रीन ल्युब्रीकंट ऑईल उपलब्ध आहेत. प्रियोळ येथील ब्रह्मानंद पेट्रोलियम या ठिकाणी ‘एक्स्ट्रा ग्रीन’ इंधन विक्री सुरू आहे, असे त्यांनी पुढे सांगितले.

Related Stories

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची नोंदणी फी महागली

Amit Kulkarni

मडगाव पालिका मुख्याधिकारीपदाची सूत्रे रोहित कदम यांनी स्वीकारली

Amit Kulkarni

महामार्गासाठी जाणारी घरे पाडण्याच्या प्रक्रियेला स्थगिती

Omkar B

तांबडीसुर्ल महादेव मंदिरात पहाटेपासून रांगा

Amit Kulkarni

कोरोनाच्या सावटात खासगी बसमालकांवर उपासमारीची भिती

Omkar B

आमदार डिकॉस्ता – कवळेकर यांच्यात पुन्हा शाब्दिक बाचाबाची

Patil_p