साबांखा मंत्री नीलेश काब्राल मंगळवारी घेणार अनुभव
प्रतिनिधी /वाळपई
गोवा सरकारचे विविध मंत्री वेगवेगळय़ा भागात जाऊन जनतेची गाऱहाणी ऐकून घेणार आहेत. त्याचप्रमाणे सदर भागातील विकास कामासंदर्भात सविस्तरपणे आढावा घेणार आहेत. वाळपई-भुईपाल रस्त्यावर खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सत्तरी तालुक्याची जबाबदारी साबांखामंत्री नीलेश काब्राल यांच्याकडे आहे. ते मंगळवारी या भागात जाणार आहेत. त्यावेळी त्यांना वाळपई भुईपाल रस्त्यात पडलेल्या खड्डय़ांचा प्रत्यक्ष अनुभव घेणार आहेत. त्यामुळे या रस्त्याबाबत काय निर्णय घेणार याकडे येथील जनतेचे लक्ष लागू राहिले आहे.
या रस्त्याच्या हॉटमिक्स डांबरीकरणाचा प्रस्ताव सरकार दरबारी प्रलंबित राहिलेला आहे. सध्या रस्त्याची पूर्णपणे वाताहात झाली आहे. या रस्त्यावर नेहमीच मोठय़ा प्रमाणात वाहतूक सुरू असते. रस्त्याच्या बिकट अवस्थेमुळे प्रवासी व वाहन चालक सरकारच्या नावाने तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.
सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल मंगळवार 10 रोजी ते सत्तरी तालुक्मयातील सरपंच, पंच सदस्य व संबंधित खात्याच्या मंत्र्यांशी सविस्तरपणे चर्चा करणार आहेत. सकाळी तालुक्मयाच्या वेगवेगळय़ा ठिकाणी झालेली रस्त्याची दुर्दशा व सरकार दरबारी प्रलंबित प्रस्तावासंदर्भात सरपंच व पंच सभासद त्यांच्यासमोर तक्रारी मांडणार आहेत.
हॉटमिक्स डाबंरीकरणाचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेतच
सध्या वाळपई होंडा दरम्यानचा रस्त्याचा अर्ध्या पट्टय़ाची अक्षरशः चाळण झालेली आहे. वाळपई ते भुईपाल हा जवळपास आठ किलोमीटर रस्त्याची खड्डय़ांमुळे दुरवस्था झाली आहे. या रस्त्याच्या हॉटमिक्स डांबरीकरणाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम खात्याला सादर केलेला आहे. मात्र वरि÷ अधिकाऱयांकडून या संदर्भात वारंवारपणे त्रुटी काढून सदर प्रस्ताव परत पाठविला जातो. यामुळे रस्त्याचे डांबरीकरण रखडले आहे. अद्याप रस्त्याच्या हॉटमिक्स डांबरीकरण प्रस्ताव सरकारने मंजूर केलेला नाही. त्यामुळे नागरिकांता संताप व्यक्त होत आहे.