@ कीव्ह / वृत्तसंस्था
युक्रेनचे चार भाग आपल्या देशात समाविष्ट करुन घेतल्याचा दावा रशियाने केला असला, तरी युपेनचा प्रतिकार सुरुच असून दोन्ही देशांमधील युद्ध थांबण्याची शक्यता नसल्याचे दिसून येत आहे. युक्रेनचे शहर लिमन येथे युपेनच्या सैनिक तुकडय़ांनी रशियाच्या सैनिक तुकडय़ांना घेराव घालून त्यांची कोंडी केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे रशियानेही या भागात सैनिक वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
शुक्रवारी युक्रेनचे चार भाग तेथील लोकांच्या इच्छेनुसार रशियात समाविष्ट झाल्याची घोषणा रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी केली होती. या सर्व भागांमध्ये जनमत संग्रह करण्यात आला. त्यात 90 टक्क्यांहून अधिक लोकांनी रशियात समाविष्ट होण्याच्या बाजूने मतदान केले, असे सांगण्यात आले. आता युक्रेनशी युद्ध थांबविण्यासाठी चर्चा करण्यास रशिया तयार आहे. मात्र हे चार भाग रशियाचेच आहेत, हे युक्रेनने मान्य करावे आणि भविष्यात या भागांवर दावा करुन् नये, अशी अट त्यांनी चर्चेसाठी ठेवली. ही अट युक्रेनने अमान्य केली आहे.
रशियाच्या 5 हजार सैनिकांना आम्ही घेरले आहे. त्यांची रसद तोडली गेली आहे. त्यांना शरण येण्यावाचून गत्यंतर नाही, असे युक्रेनच्या सैनिक अधिकऱयांनी स्पष्ट केले. मात्र, या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. रशियाने युक्रेनवर नव्याने हल्ला करण्यासाठी 3 लाख सैनिकांची जमवाजमव करण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, रशियन युवक युद्धावर जाण्यास तयार नाहीत, असे दिसून आले.