श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील बडगाममधील मगम भागात रविवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. गुप्तचर विभागाकडून या परिसरात दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. यानंतर जवानांनी परिसराला घेराव घालून शोधमोहीम सुरू केली. या मोहिमेवेळी दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर गोळीबार केल्यानंतर शोधमोहिमेचे चकमकीत रुपांतर झाले. सायंकाळी उशिरापर्यंत येथे सुरक्षा यंत्रणा अलर्टवर होत्या. मात्र, या कारवाईत मोठे यश हाती लागले नव्हते. तसेच कोणतीही जीवितहानी झाल्याचेही वृत्त नाही. मध्य काश्मीर जिह्यातील मगममधील रेडबाग भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घालत शोधमोहीम सुरू करण्यात आली होती, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱयाने सांगितले. यापूर्वी 28 डिसेंबर रोजी जम्मूच्या बाहेरील सिध्रा येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली होती.