Tarun Bharat

मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा शिरकाव

Advertisements

वनखात्याची डोकेदुखी वाढली : वन्यप्राण्यांना रोखण्याचे आव्हान : भुतरामहट्टीत हरिणाचा वावर

प्रतिनिधी /बेळगाव

रेसकोर्स परिसरात दहशत माजविलेल्या बिबटय़ाचा आठवडाभरापासून शोध सुरू असतानाच विविध ठिकाणी वन्यप्राणी आढळून आले आहेत. विशेषतः मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने वनखात्याची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान, वन्यप्राण्यांचा शोध घेऊन त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे मोठे आव्हान वनखात्यासमोर आहे.

जाधवनगरमध्ये हल्ला करून रेसकोर्स परिसरात आसरा घेतलेल्या बिबटय़ाचा अद्याप शोध लागला नाही. बिबटय़ाच्या शोधासाठी 14 ट्रपकॅमेरे, 6 पिंजरे, 3 ड्रोन कॅमेरे आणि 50 वनकर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मात्र आठवडा उलटला तरी वनखात्याला अपयश आले आहे. त्यामुळे अखेर बिबटय़ा गेला कुठे? हाच प्रश्न शहरवासियांना पडला आहे.

दरम्यान, बिबटय़ाच्या धास्तीने परिसरातील 22 शाळांना सुटी देण्यात आली आहे. मात्र अद्याप बिबटय़ा सापडला नसल्याने नागरिकांबरोबरच विद्यार्थ्यांच्या शाळेचा प्रश्नदेखील उभा ठाकला आहे. बिबटय़ा सापडेपर्यंत परिसरातील शाळांना सुटी द्यावी की शाळा सुरू ठेवाव्यात? असा प्रश्नही प्रशासनासमोर आहे.

मुडलगीत शेळीचा फडशा

बेळगाव रेसकोर्स परिसरात दहशत माजविलेल्या बिबटय़ाचा शोध सुरू असतानाच मुडलगी तालुक्मयातील धर्मट्टी येथे एका बिबटय़ाने शेळीचा फडशा पाडल्याची घटना गुरुवारी घडली आहे. त्यामुळे मुडलगी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबटय़ाने शेळीवर हल्ला करून शेळी पळविल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

भुतरामहट्टीत हरिण सुसाट, ग्रामस्थांची तारांबळ

शुक्रवारी सकाळी भुतरामहट्टी गावात चितळ जातीचे हरिण आढळून आले आहे. गावातून हरिण सुसाट धावत सुटल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. दरम्यान, काहींनी घाबरून घराचे दरवाजे व खिडक्मया बंद केल्या. सैरभैर झालेले हे नर जातीचे हरिण आहे. शिवाय वन्यप्रदेशातील कळपातून ते बाहेर पडले असावे, असा अंदाज वनखात्याने वर्तविला आहे. शिवाय हरिण पुन्हा निदर्शनास किंवा सापडल्यास तातडीने वनखात्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आठवडाभरात तीन ठिकाणी आढळले बिबटय़ा

मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा वावर वाढला असून येडूरवाडी, बेळगाव, मुडलगीत बिबटय़ा तर भुतरामहट्टीत हरिण आढळून आले आहे. त्यामुळे वनखात्याची डोकेदुखी वाढली आहे. शिवाय वन्यप्राण्यांना रोखण्याचे नवे आव्हानही उभे ठाकले आहे. आठवडाभरात तीन ठिकाणी बिबटय़ा तर एका ठिकाणी हरिणाचे दर्शन झाले आहे. त्यामुळे निदर्शनास आलेले बिबटे आणि हरिण वनखात्याच्या हाताला लागणार का? हाच प्रश्न आता बेळगाव, येडूरवाडी, मुडलगी आणि भुतरामहट्टीतील नागरिकांना पडला
आहे.

वन्यप्राण्यांच्या शोधासाठी खात्यामार्फत प्रयत्न सुरू

बेळगाव, येडूरवाडी, मुडलगी या ठिकाणी बिबटय़ा दिसून आला आहे. शिवाय भुतरामहट्टीत हरिण आढळून आले आहे. या वन्यप्राण्यांच्या शोधासाठी खात्यामार्फत प्रयत्न सुरू आहेत. सैरभैर झालेल्या वन्यप्राण्यांना पकडून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

– मल्लिनाथ कुसनाळ (एसीएफ वनखाते, बेळगाव)

मोदगा येथे आढळले तरस

बेळगाव, येडूरवाडी, मुडलगी येथे बिबटय़ा तर शुक्रवारी भुतरामहट्टीत हरिण त्यापाठोपाठ मोदगा येथे तरस आढळून आले आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. पंतबाळेकुंद्रीजवळील मोदगा गावच्या दक्षिणेच्या बाजूला दाट झाडी व वन्यप्रदेश आहे. या ठिकाणाहून हे तरस आल्याचा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

मागील तीन दिवसांपासून या तरसाचे दर्शन होत असून शुक्रवारी ते गावच्या वेशीपर्यंत आल्याची माहितीही ग्रामस्थांनी दिली. प्रथमदर्शनी बिबटय़ा असल्याचा संशय व्यक्त केला. मात्र नंतर ते तरस असल्याचे स्पष्ट झाले. आधीच बेळगाव रेसकोर्स परिसरात बिबटय़ाने दहशत माजविली आहे. त्यातच विविध ठिकाणी वन्यप्राणी आढळून आले आहेत. त्याचबरोबर आता मोदगा गावातदेखील तरस निदर्शनास आल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय तरसाला पकडण्याचे आव्हान वनखात्यासमोर उभे ठाकले आहे.

Related Stories

कोणत्याही प्रकारचे हल्ले डॉक्टर खपवून घेणार नाहीत

Amit Kulkarni

बाप्पांच्या आगमनाची तयारी पूर्ण

Patil_p

लिंगराज कॉलेजसमोर हिजाबवरून पुन्हा वाद

Amit Kulkarni

सफाई कर्मचाऱयांच्या समस्या निवारणाचा ठराव

Amit Kulkarni

ड्रेनेज खोदाईमुळे चव्हाट गल्लीतील रहिवासी त्रस्त

Amit Kulkarni

बेळगावात आयकर विभाग मुख्य आयुक्तांची नियुक्ती करा

Patil_p
error: Content is protected !!