मनपासमोर फलक घेऊन शंकर पाटील यांचे आंदोलन
प्रतिनिधी/ बेळगाव
महानगरपालिकेची निवडणूक होऊन 14 महिने उलटले. परंतु अद्याप शपथविधी झाला नसल्याने त्यांच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला आहे. सरकारने केलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ नगरसेवक शंकर पाटील यांनी महानगरपालिकेच्या दुर्लक्षाचा निषेध करत फलक हातात घेऊन आंदोलन केले.
बेळगावमधील नागरिकांनी म्हणजेच मतदारांनी आम्हाला नगरसेवक म्हणून निवडून दिले. मात्र 14 महिने होऊनसुद्धा अद्याप आमचा शपथविधी झाला नाही. परिणामी आम्ही आमच्या प्रभागांचा विकास करू शकत नाही, नागरिकांच्या समस्या दूर करू शकत नाही, असे म्हणत त्यांनी आंदोलन केले.
सर्वच नगरसेवकांमध्ये सरकारच्या या दुर्लक्षाबद्दल नाराजी पसरली आहे. आज आपण आंदोलन छेडले आहे. परंतु सरकारने अधिक विलंब केल्यास आता ठिय्या आंदोलन छेडणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.