सेन्सेक्स 460 अंकांनी नुकसानीत ः ऍक्सिस, रिलायन्ससह इन्फोसिसचे समभाग घसरले
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवडय़ातील शेवटच्या दिवशी शुक्रवारच्या सत्रात सेन्सेक्स व निफ्टी घसरणीसह बंद झाले आहेत. यामध्ये दिवसभरातील कामगिरीनंतर ऍक्सिस बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इन्फोसिस यांच्या समभागात विक्री झाल्याने बीएसई सेन्सेक्स 460.19 अंकांनी प्रभावीत झाला आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 460.19 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 57,060.87 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 142.50 अंकांनी घसरुन निर्देशांक 17,102.55 वर बंद झाला आहे.
प्रमुख कंपन्यांच्या मदतीने शुक्रवारी सेन्सेक्समधील ऍक्सिस बँक, पॉवरग्रिड कॉर्प, विप्रो, भारतीय स्टेट बँक, मारुती सुझुकी, टायटन आणि एनटीपीसीचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. ऍक्सिस बँकेचा तिमाही निकाल जाहीर झाला असून बँक नफ्यात असतानाही बँकेचे समभाग मात्र शुक्रवारच्या सत्रात घसरणीत राहिले. दुसऱया बाजूला कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक, सन फार्मा, टाटा स्टील आणि डॉ. रेड्डीज लॅब यांचे समभाग लाभासह बंद झाले आहेत.
जागतिक पातळीवरील घडामोडींमध्ये आशियातील अन्य बाजारांमध्ये हाँगकाँगचा हँगसेंग, चीनचा शांघाय कम्पोझिट यांचे निर्देशांक तेजीत तर दक्षिण कोरियातील कोस्पी तेजीसोबत बंद झाले आहेत. दुसरीकडे युरोपीयन प्रमुख बाजारात तेजी कायम राहिल्याचे दिसून आले.
याच दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 1.91 टक्क्यांनी वाढून 109.65 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे. सकाळचे शेअर बाजारातले सत्र हे तेजीसोबत सुरू झाले होते. पण शेवटच्या सत्रात मात्र बाजार काहीसा घसरणीकडे झुकला. बाजारात आयटी निर्देशांक व ऑटो निर्देशांक 1 टक्के इतके घसरणीत होते. मीडिया निर्देशांकातही विक्रीचा ओघ दिसला. वित्त, धातू, फार्मा यांच्यासह इतर निर्देशांकही शुक्रवारी कमकुवत होत बंद झाले होते. सेन्सेक्समधील 30 पैकी 21 समभाग घसरणीसह बंद झाले होते. तर एफआयआयने 743.22 कोटी रुपये मूल्याच्या समभागाची खरेदी केल्याची नोंद यावेळी करण्यात आली आहे.