Tarun Bharat

New delhi; हवालाप्रकरणी दिल्लीचे आरोग्यमंत्री ईडीच्या अटकेत

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना हवालाप्रकरणात ईडीने अटक केली आहे. जैन यांना आज विशेष न्यायालयात हजर करून चौकशीसाठी रिमांडवर घेण्याची तयारी ईडीकडून सुरू आहे.

ईडीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कोलकाता येथील शेल कंपन्यांमार्फत हवाला प्रकरणात सत्येंद्र जैन आणि त्यांच्या साथीदारांना 4.81 कोटी रुपयांची रक्कम मिळाल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले होते. हे प्रकरण सीबीआयने 24 ऑगस्ट 2017 रोजी दाखल केलेल्या प्रकरणाशी संबंधित आहे. याप्रकरणी सीबीआयने जैन आणि त्याच्या साथीदारांविरोधात विविध फौजदारी कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. या एफआयआरच्या आधारे ईडीने मनी लॉन्ड्रिंग कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.

तपासादरम्यान ईडीला या प्रकरणात हवाल्याद्वारे कोलकाता आधारीत एन्ट्री ऑपरेटर्सला रोख हस्तांतरणाच्या बदल्यात 4.81 कोटी रुपये मिळाल्याचे सबळ पुरावे मिळाले. या पैशातून पंधरा दिवसांपूर्वी जैन यांनी दिल्ली आणि परिसरात खरेदी केलेली स्थावर मालमत्ता सुरुवातीला जप्त करण्यात आली. जैन यांनी या प्रकरणात ईडीला तपासात सहकार्य केलं नाही. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. जैन यांना आज ईडीच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Related Stories

228 कलाकृती देशात परत आणण्यास सरकारला यश

Omkar B

सर्व मुद्दय़ांवर चर्चेची तयारी : पंतप्रधान

Patil_p

मुंबई : फोर्ट परिसरातील इमारतीचा स्लॅब कोसळला, 40 जणांना वाचवण्यात यश

Tousif Mujawar

मनसुख हिरेनच्या हत्येसाठी ४५ लाखांची सुपारी; NIA चा दावा

Archana Banage

गहलोत सरकारकडून पुढील आठवड्यासाठी राजस्थानच्या सीमा बंद

Tousif Mujawar

दिल्लीमध्ये कोरोनाचे 4,127 नवे रुग्ण; 30 जणांचा मृत्यू

Tousif Mujawar
error: Content is protected !!