लंडन / वृत्तसंस्था
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी यजमान इंग्लंडचा डाव 32 षटकात 6 बाद 116 असा गडगडला. बुधवारी पावसाचा व्यत्यय आल्यानंतर बराच वेळ खेळ थांबवावा लागला, त्यावेळी अर्धशतकवीर ऑलि पोप 61 तर स्टुअर्ट ब्रॉड शून्यावर खेळत होते. ऍलेक्स लीज (5), झॅक क्राऊली (9), जो रुट (8), बेअरस्टो (0), बेन स्टोक्स (20), बेन फोक्स (6) ठरावीक अंतराने बाद होत राहिले. द. आफ्रिकन संघातर्फे ऍनरिच नोर्त्झेने 43 धावात 3 तर रबाडाने 36 धावात 2 बळी घेतले. मार्को जान्सनने 18 धावात 1 फलंदाज बाद केला. उभय संघातील या मालिकेत 3 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत.