Tarun Bharat

इंग्लंड संघाची विजयाकडे वाटचाल

रावळपिंडी/ वृत्तसंस्था

यजमान पाक आणि इंग्लंड यांच्यात येथे सुरु असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत रविवारी खेळाच्या चौथ्या दिवसाअखेर इंग्लंडचा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. इंग्लंडने पाकला निर्णायक विजयासाठी 343 धावांचे कठिण आव्हान दिल्यानंतर पाकने दुसऱया डावात 2 बाद 80 धावा जमविल्या आहेत. खेळाच्या शेवटच्या दिवशी पाकला विजयासाठी 263 धावांची गरज असून त्यांचे 8 गडी खेळावयाचे आहेत.

या कसोटीमध्ये फलंदाजीस अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर इंग्लंडने पहिल्या डावात 657 धावांचा डोंगर उभा करताना त्यांच्या 4 फलंदाजांनी दमदार शतके झळकविली. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकने पहिल्या डावात 155. 3 षटकात 579 धावा जमविल्या. इंग्लंडने पहिल्या डावात पाकवर 78 धावांची आघाडी मिळविली. पाकने 7 बाद 499 या धावसंख्येवरुन चौथ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचे शेवटचे 3 गडी 80 धावांची भर घालत तंबूत परतले. पाकतर्फे अब्दुल्ला शफिकने 114, इमाम उल हकने 121, बाबर आझमने 136, सलमानने 53 धावा जमविल्या. इंग्लंडतर्फे कसोटी पदार्पण करणाऱया विल जॅक्सने 161 धावात 6 तर लिचने 2, रॉबिनसन आणि अँडरसन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

इंग्लंडने आपला दुसरा डाव 35.5 षटकात 7 बाद 264 धावांवर घोषित करुन पाकला निर्णायक विजयासाठी 343 धावांचे आव्हान दिले. इंग्लंडच्या डावात सलामीच्या क्रॉलेने 7 चौकारांसह 50, रुटने 6 चौकारांसह 73, ब्रुकने 3 षटकार आणि 11 चौकारांसह 87, जॅक्सने 3 षटकार आणि 1 चौकारासह 24 धावा जमविल्या. पाकतर्फे नसिम शाहा, मोहम्मद अली, मेहमूद यांनी प्रत्येकी 2 तर सलमानने 1 गडी बाद केला.

पाकने दिवसअखेर 20 षटकात 2 बाद 80 धावा जमविल्या. सलामीचा शफिक 6 धावांवर झेलबाद झाला. कर्णधार बाबर आझम 4 धावांवर बाद झाला. अझहर अलीला दुखापत झाल्याने तो निवृत्त झाला. इमाम उल हक 43 तर शकिल 24 धावांवर खेळत आहेत. इंग्लंडतर्फे रॉबिनसन आणि स्टोक्स यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला आहे.

संक्षिप्त धावफलक – इंग्लंड प. डाव ः 101 षटकात सर्वबाद 657, पाक प. डाव ः 155. 3 षटकात सर्वबाद 579 (शफिक 114, इमाम उल हक 121, बाबर आझम 136, शकिल 37, रिझवान 29, सलमान 53, जॅक्स 6-161, लिच 2-190, अँडरसन 1-52, रॉबिनसन 1-72), इंग्लंड दु. डाव ः 35.5 षटकात 7 बाद 264 डाव घोषित (क्रॉले 50, पॉप 15, रुट 73, ब्रुक 87, जॅक्स 24, नसिम शहा, मोहम्मद अली आणि झहिद मेहमूद प्रत्येकी 2 बळी, सलमान 1 बळी), पाक दु. डाव ः 20 षटकात 2 बाद 80 (शफिक 6, बाबर आझम 4, इमाम उल हक खेळत आहे 43, शकिल खेळत आहे 24, रॉबिनसन 1-22, स्ट्रोक्स 1-20).

Related Stories

फायनलमध्ये धडक हीच चेन्नई-दिल्लीची महत्त्वाकांक्षा!

Patil_p

भारत अ संघाच्या विजयात हंपी, वैशाली चमकले

Patil_p

…तर वॉर्नर आयपीएल स्पर्धेत निश्चित खेळणार

Patil_p

सौदी अरेबियन क्लबशी रोनाल्डो करारबद्ध

Patil_p

रवी शास्त्री कोरोना पॉझिटिव्ह; 3 सदस्य आयसोलेट

datta jadhav

लखनौने हिसकावला चेन्नईच्या विजयाचा घास!

Amit Kulkarni