Tarun Bharat

इंग्लंड महिला संघाची विंडीजवर मात

वृत्तसंस्था/ नॉर्थ साऊंड (अँटिग्वा)

इंग्लंडचा महिला क्रिकेट संघ सध्या विंडीजच्या दौऱयावर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळण्यासाठी दाखल झाला आहे. या मालिकेतील रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने यजमान विंडीजचा 142 धावांनी दणदणीत पराभव करून विजयी सलामी दिली.

या सामन्यात इंग्लंड संघातील नॅट स्किव्हरची 90 धावांची खेळी तसेच चार्ली डीनचे 4 बळी ही वैशिष्टय़े ठरली. या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी दिली. इंग्लंडने 50 षटकात 7 बाद 307 धावा जमविल्या. त्यानंतर विंडीजचा डाव 40.3 षटकात 165 धावात आटोपला. इंग्लंड संघातील स्किव्हरने 96 चेंडूत 9 चौकारांसह 90 धावांचे योगदान दिले. तसेच डॅनी वॅटने 60 चेंडूत 60 धावा जमविताना 3 षटकार ठोकले. वॅटचा हा शंभरावा वनडे सामना होता. कर्णधार नाईटने 16 धावा जमविल्या.

त्यानंतर विंडीजच्या डावाला बऱयापैकी सुरुवात झाली. त्यांनी 20 षटकाअखेर 1 बाद 84 धावा जमविल्या होत्या. पण त्यानंतर त्यांचे 2 गडी पाठोपाठ बाद झाल्यानंतर त्यांचा डाव कोसळला. इंग्लंडच्या डीनने कॅम्पबेलचा खाते उघडण्यापूर्वीच त्रिफळा उडविला. तर विंडीजची विलियम्स 34 धावांवर धावचीत झाली. यानंतर विंडीजने आपले 6 गडी केवळ 25 धावात गमावले. मॅथ्यूजने एकाकी लढत देत 34 तर नाईटने 39 धावा जमविल्या. इंग्लंडच्या डीनने भेदक गोलंदाजी करत 35 धावांत 4 बळी टिपत आपल्या संघाच्या विजयाला हातभार लावला. हा सामना एकतर्फीच झाला. आता या मालिकेतील दुसरा वनडे सामना मंगळवारी तर अंतिम सामना येत्या शुक्रवारी खेळविला जाणार आहे. वनडे मालिका संपल्यानंतर उभय संघांमध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळविली जाणार आहे.

Related Stories

भारत-पाकिस्तान संघांना स्लो ओव्हर-रेटमुळे दंड

Patil_p

टॉफेल, टकर, किटलबॉरो पंच पॅनेलमध्ये

Patil_p

भारतीय क्रिकेट संघाच्या सरावाला प्रारंभ

Patil_p

बोप्पाणा- रामकुमार जोडीला दुसरे सिडींग

Patil_p

ओडिशा एफसीने जमशेदपूरला रोखले बरोबरीत

Patil_p

लॉर्ड्सऐवजी साऊदम्प्टनमध्ये अंतिम लढत

Patil_p