Tarun Bharat

इंग्लंडची महिला क्रिकेटपटू श्रबसोल निवृत्त

Advertisements

वृत्तसंस्था /लंडन

इंग्लंडची महिला क्रिकेटपटू अनया श्रबसोलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. 2009 आणि 2017 साली आयसीसी महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अजिंक्यपद मिळविणाऱया इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघामध्ये श्रबसोलचा समावेश होता.

श्रबसोलने वयाच्या 30 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतल्याची माहिती इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने दिली आहे. 2017 साली झालेल्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात श्रबसोलने भारताविरूद्ध खेळताना सहा बळी मिळविल्याने इंग्लंडने हा सामना 9 धावांनी जिंकला होता. श्रबसोलने क्रिकेटच्या विविध प्रकारामध्ये इंग्लंडचे प्रतिनिधीत्व करताना 173 सामन्यात 227 गडी बाद केले. इंग्लंडच्या महिला टी-20 क्रिकेट प्रकारातही श्रबसोलने 102 गडी बाद करून विक्रम नोंदविला आहे. श्रबसोलने आपल्या 14 वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीला निरोप देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान ती आणखी काही दिवस इंग्लंडमधील विविध राष्ट्रीय महिला क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळणार आहे. अलिकडेच न्यूझीलंडमध्ये झालेल्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात श्रबसोलने 3 गडी बाद पेले पण इंग्लंडला हा सामना 71 धावांनी गमवावा लागल्याने ऑस्ट्रेलियाने जेतेपद पटकाविले.

Related Stories

भारताचा जर्मनीवर एकतर्फी विजय

Patil_p

कोलकाता संघाला विजयाची गरज

Patil_p

रशियाऐवजी चेन्नईत होणार ‘चेस ऑलिम्पियाड’

Patil_p

भारतीय महिला हॉकी संघाचा पराभव

Patil_p

यजमान इंग्लंडने साकारला मालिकाविजय

Patil_p

कास्पर रूड अजिंक्य

Patil_p
error: Content is protected !!