Enthusiastic response from public to Maja Vengurla Sanstha’s Kite Festival
वेंगुर्ला माझा या संस्थेतर्फे श्री क्षेत्र सागरेश्वर नवाबाग बीच येथे दि. 18 व 19 फेब्रुवारी कालावधीत पर्यटन वृध्दीच्या अनुषंगाने सलग 5 व्या वर्षी आयोजित केलेल्या पतंग महोत्सवास वेंगुर्ले तालुक्यासह जिल्ह्यातील पर्यटन प्रेमींकडून उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. या पतंग महोत्सवात आलेल्या व्यक्तींना स्वत:हि पतंग आकाशात उडविण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे या महोत्सवाbत असंख्य पतंग आकाशात हवेत भरारी घेताना दिसत होते..यावेळी सारस्वत बँकेचे सल्लागार संचालक सुनिल सौदागर, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, शेटये-टांककर चँरीटेबल ट्रस्टचे जनार्दन शेटये, भाजपाच्या वैद्यकिय आघाडीचे प्रदेश संयोजक डाँ. अमेय देसाई, नकुल पार्सेकर, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, वेंगुर्ला रोटरी क्लबचे अध्यक्ष सुनील रेडकर, माझा वेंगुर्ला संस्थेचे अध्यक्ष नीलेश चेंदवणकर, पदाधिकारी राजन गावडे, सचिन वालावलकर, मोहन होडावडेकर, कपिल पोकळे, संजय पुनाळेकर, गणेश अंधारी, अवधूत नाईक, प्रशांत आपटे, वसंत तांडेल, दादा केळूसकर, अमृत काणेकर, खेमराज कुबल, यासीन मकानदार, राज पोकळे, राजेश घाटवळ, सुनिल डुबळे, बाळा शिरसाट, अमोल खानोलकर, विश्वास पवार, महेश वेंगुर्लेकर, आश्विनकुमार मांजेरकर, जीवन परब, संदिप परब, पंकज शिरसाट, उभादांडा सरपंच निलेश चमणकर, माजी सभापती जयप्रकाश चमणकर, भाजपाचे पदाधिकारी प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, विजय रेडकर, बाळू प्रभू, विष्णू उर्फ पपू परब, जेष्ठ पत्रकार मयुर खानोलकर, संदिप गावडे, साईप्रसाद नाईक, गणपत केळूसकर, प्रकाश मोटे, अमोल खानोलकर, तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्ती व त्यांचे परीवार आणि मित्रमंडळी मोठय़ा संख्येने या पतंग महोत्सवास सहभगी झाली होती.पतंग महोत्सवांतील खास आकर्षण वाळू शिल्पनवाबाग समुद्र किनाऱ्यावरील या पतंग महोत्सवाच्या ठिकाणी दाभोवाडा येथील युवक संजू हुले यांनी कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे वाळू शिल्प विविध रंगांनी भरून बनविले होते. या वाळू अप्रतिम वाळू शिल्पाकडे गेलेले नागरीक भक्ती भावाने नतमस्तय होताना दिसत होते.पतंग महोत्सवासाठी येणाऱ्या सर्व गाडय़ांसाठी पार्कीग व्यवस्था या पतंग महोत्सवास वाहने घेऊन येणाऱ्या पतंग प्रेमी नागरीकांसाठी वेंगुर्ले बंदर येथून झुलत्या पुलावरून नवाबाग बीच येथे जाणाऱ्या नागरीकांसाठी दाभोसवाडा ते मांडवी या रस्त्याच्या भागांत वाहने पार्कीगची सुविधा नगरपरीषद व पोलीस प्रशासनामार्फत करण्यांत आली होती. त्यासाठी वहातुक पोलीस मनोज परूळेकर व नगरपरीषदेचे कर्मचारी तेथे कार्यरत होते. कारण झुलत्या पुलाच्या ठिकाणी ट्राफीक होण्याची शक्यता होती. तसेच नवााबाग घुमटेश्वर-बायुला मंदिर, नवाबाग जेटी परीसरात वाहने पार्कीगची व्यवस्था करण्यात आली होती.झुलता पुल या पतंग महोत्सवासाठी नागरीकांना सोयीस्कर ठरला.
यार्षी प्रथमच झुलत्या पुलाचे काम पुर्ण झाल्यामुळे व या झुलत्या पुलाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाल्याने या पुलावरून असंख्य नागरीकांनी माझा वेंगुर्लाने आयोजित केलेल्या पतंग महोत्सवास मोठी गर्दी झाली. त्यामुळे नवाबाग रस्त्यावर वाहतुक कोंडीचा प्रश्न आला नाही.
विविध स्वरूपाचे आकर्षक व लक्षवेधी ठरणारे पतंग आकाशांत झेपावले.टीम मंगलोर (कर्नाटक), फ्लाय 360 डहाणू, (महाराष्ट्र) व कोहिनूर काइट फ्लाईंग क्लब हैदराबाद, (तेलगंणा) येथून आलेल्या टीमने गरूडापक्षी, सातांक्लाँज, मिकीमाऊस, घुबड, मोर, स्पिनर, व्हाँलीबाँल, वटवागुळ, मंगलोरची कोकीळा, आक्टोपस, देशाच्या तिरंगा ध्वजाच्या रंगाचे लांबचलांब रांग असलेले एकाच धाग्यात गुंफलेले असंख्य पतंग यासह अनेक पक्षांचे पतंग नवाबाग किनाऱ्यावरील आकाशात तरंगत होते..या दोन दिवशीय पतंग महोत्सवातील कार्यक्रमांत सुत्रसंचालनाचे काम काका सावंत यांनी केले तर आलेल्या मान्यवरांचे स्वागत माझा वेंगुर्ला संस्थेचे निलेश चेंदवणकर व अन्य सदस्यांनी केले.
वेंगुर्ले (वार्ताहर)