Tarun Bharat

दिल्लीत ‘मंकीपॉक्स’चा शिरकाव, देशातील रुग्णसंख्या 4 वर

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

दिल्लीत मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. या रुग्णाला ताप आणि त्वचेवर जखमा झाल्या होत्या. रुग्णाने परदेश प्रवास केल्याची कोणतीही नोंद नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणा आता अलर्ट झाल्या आहेत. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत 31 वर्षीय युवकाला मंकीपॉक्सचा संसर्ग झाला आहे. या रुग्णावर मौलाना आझाद मेडिकल कॉलजेमध्ये उपचार सुरू आहेत. या रुग्णाला ताप आणि त्वचेच्या जखमांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चेहऱ्यावरील जखमांमुळे त्याची मंकीपॉक्सची टेस्ट करण्यात आली. या टेस्टमध्ये हा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला. दिल्लीमध्ये मंकीपॉक्सची ही पहिलीच केस असल्यामुळे खळबळ उडाली आहे. या रुग्णाने कुठेही परदेश प्रवास केल्याची नोंद नाही. 

भारतातील मंकीपॉक्सची ही चौथी केस आहे. यापूर्वी केरळमध्ये मंकीपॉक्सचे तीन रुग्ण आढळून आले आहेत.

हेही वाचा : शिंदेंचा आत्महत्यामुक्त महाराष्ट्राचा संकल्प ठरतोय फोल, 23 दिवसातच 89 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Related Stories

किरनळी येथे हातभट्टी दारू व गुळमिश्रित रसायन व्यवसायावर पोलिसांची धाड

Sumit Tambekar

‘हे’ घर भाडय़ाने देणे आहे

Patil_p

शाहू ग्रुप मार्फत भव्य ‘राजर्षि छ. शाहू महाराज कागल मॅरेथॉन’ स्पर्धा

Abhijeet Khandekar

उत्तराखंडात कोरोनाबाधितांनी ओलांडला 71 हजारांचा टप्पा

Rohan_P

विद्यार्थ्यांना मिळणार फीचे संपूर्ण पैसे परत

datta jadhav

खासगी प्रयोगशाळांमध्येही कोरोना चाचणी मोफत करा

Patil_p
error: Content is protected !!