ऑनलाईन टीम / तरुण भारत :
सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत ‘एक्झिक्युटिव्ह एन्क्लेव्ह’च्या बांधकामासाठी दिल्ली प्रदेश पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. या ‘एक्झिक्युटिव्ह एन्क्लेव्ह’मध्ये पंतप्रधान मोदींचे नवीन कार्यालय आणि कॅबिनेट सचिवालय बांधले जाणार आहे.
दिल्ली प्रदेश विशेषज्ञ मूल्यमापन समितीने गेल्या आठवडय़ात ‘एक्झिक्युटिव्ह एन्क्लेव्ह’च्या बांधकामासाठी पर्यावरणीय मंजुरीसाठी शिफारस केली होती. त्याला मंजुरी देण्यात आली आहे. पण या प्रकल्पाच्या बांधकामाच्या ठिकाणी असलेली 60 टक्के झाडे पुनर्रोपण करण्याचे आदेश आहेत. यापूर्वी 23 ऑगस्ट रोजी वन विभागाने केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्ली वृक्ष संरक्षण कायदा, 1994 अंतर्गत सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या ठिकाणाहून 807 पैकी 487 झाडे पूनर्रोपण करण्यास मंजुरी दिली होती.
अधिक वाचा : शिंदे गटातील शिवसेना पदाधिकाऱ्याची गळा आवळून हत्या, तलावात आढळला मृतदेह