ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव लक्षात घेता आर्थिक संकटात सापडलेल्या खातेधारकांना दिलासा देण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. EPFO खातेधारक आता दुसऱ्यांदा नॉन-रिफंडेबल कोविड ॲडव्हान्स घेऊ शकतात.
मार्च 2020 मध्येही सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत EPFO खातेधारकांना ॲडव्हान्स सुविधा उपलब्ध करून दिली होती. आज कामगार मंत्रालयाने देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव लक्षात घेऊन आणखी एक नॉन-रिफंडेबल कोविड ॲडव्हान्स घेण्याची परवानगी दिली आहे. या अंतर्गत खातेधारकांना पीएफ खात्यातील 75% रक्कम किंवा तीन महिन्यांच्या पगारासमान रक्कम खात्यातून काढता येईल.