कोल्हापुरात पीसीआरमध्ये उपचारासाठी आणलेल्या कैद्याने पलायन केल्याची घटना आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. निवास होनमाने असे या कैद्याचे नाव आहे. तो डॉक्टर तपासणी करत असताना पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. कैदी पळून गेल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथके पाठवली आहेत.
अधिक वाचा : राज्यातील अवैध बांधकामांवरील तिप्पट दंड माफ