नगरपरिषदेच्या उपक्रमाचे ज्येष्ठांकडून स्वागत
पन्हाळा/प्रतिनिधी
उतार वयात वेळ घालवणे कठीण बनलेले असते.त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या समोर आपला दैनंदिन वेळ कसा घालवायचा असा प्रश्न पडतो. त्याअनुषंगाने पन्हाळा नगरपरिषदेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी विरुगंळा केंद्राची दोन ठिकाणी स्थापन केली असल्याने ज्येष्ठ नागरिकांना याचा चांगला उपयोग होणार आहे. तर नगरपरिषदेच्या उपक्रमाचे ज्येष्ठांकडून स्वागत करण्यात येत आहे.पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषद मार्फत
महाराष्ट्र शासनाच्या सर्वसमावेशक जेष्ठ नागरिक धोरण २०१३ च्या अनुषंगाने तसेच जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या सुचनेनुसार पन्हाळा शहरात जेष्ठ नागरिकांकरिता महालक्ष्मी मंदिर परिसर व शिवतीर्थ उद्यान या ठिकाणी याप्रमाणे एकूण दोन विरंगुळा केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. या ठिकाणी जेष्ठ नागरिकांकरिता बसण्याकरिता बाकांची सोय असून वाचनासाठी दैनिक वृतपत्रे ठेवणेत येणार आहेत . तसेच सदर ठिकाणी जेष्ठ नागरिकांकरिता आवशक्यतेनुसार विविध सोयी उपलव्ध करून देण्यात येणार आहेत. तरी पन्हाळा शहरातील जेष्ठ नागरिकांनी सदर विरंगुळा केंद्राचा लाभ घ्यावा त्याचबरोबर आवश्यक सोयी उपलब्ध करून घेणे करिता नगरपरिषदेशी संपर्क करावा असे आवाहन मुख्याधिकारी स्नेहलता कुंभार यांनी केले.