सावंतवाडी/ प्रतिनिधी-
सावंतवाडीत रविवारी सिंधुदुर्ग बॉडी असोसिएशनची स्थापना करण्यात आली असून यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी पुंडलिक दळवी यांची निवड करण्यात आली आहे. या बैठकीवेळी महाराष्ट्र बॉडी बिल्डर असोसिएशनचे खजिनदार आशिष वर्तक हे उपस्थित होते. वर्तक यांच्या उपस्थितीत अध्यक्ष आणि इतर कार्यकारणीची देखील निवड करण्यात आली.
नवीन व होतकरू बॉडी बिल्डर्सना सहभागी करून त्यांना जिल्ह्याचे, राज्याचे आणि देशाचे नाव उज्वल करण्यासाठी संधी देण्याच्या दृष्टीने आम्ही ही संघटना स्थापन केली असल्याचे पुंडलिक दळवी यांनी स्पष्ट केले यावेळी बॉडी बिल्डिंग क्षेत्रातले जयप्रकाश नार्वेकर, अविनाश हिरोजी, शिवाजी जाधव, अमित कदम, मंदार फाटक, महेश परब हे उपस्थित होते.