Tarun Bharat

सिग्नल सुटला तरी वाहनधारक थांबूनच!

Advertisements

डॉ. राजेंद्र प्रसाद चौकमधील प्रकार : हिरवा सिग्नल बंद असल्याने वाहनधारकांमध्ये गेंधळ : सिग्नल व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी

प्रतिनिधी /बेळगाव

शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी विविध चौकात ट्रफिक सिग्नल सुविधा करण्यात आली आहे. मात्र बहुतांश चौकातील सिग्नल सुविधा खराब झाली असल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. डॉ. राजेंद प्रसाद चौकात हिरवा सिग्नल लागला तरी वाहनधारक थांबूनच राहत आहेत. हिरवा सिग्नल बंद असल्याने वाहनधारकांमध्ये गेंधळ निर्माण होत आहे.

शहरातील प्रमुख रस्त्यांवर धावणाऱया वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी रहदारी खात्याच्यावतीने विविध चौकात ट्रफिक सिग्नल बसविण्यात आले आहेत. राणी चन्नम्मा चौक, मध्यवर्ती बसस्थानक, कोल्हापूर क्रॉस आदी ठिकाणचे ट्रफिक सिग्नल सुरू आहेत. मात्र राजेंद्र प्रसाद चौकमधील ट्रफिक सिग्नल खराब झाला असून याचा फटका वाहनधारकांना बसत आहे. सिग्नल सुटल्यानंतर हिरव्या रंगाचा दिवा व्यवस्थित लागत नसल्याने वाहनधारकांमध्ये गैरसमज निर्माण होत आहे. युनियन जिमखान्याकडे जाणाऱया रस्त्यावरील हिरवा दिवा सुरू नसल्याने वाहनधारक थांबून रहात आहेत.

गोगटे चौकात चार रस्ते मिळत असून याठिकाणी वाहनांची गर्दी होत असते. पण या चौकातील सिग्नल बंद असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. तसेच सर्वच वाहनधारक पुढे जात असल्याने अपघात होण्याची शक्मयता आहे. याठिकाणी रहदारी पोलिसांची नियुक्ती करण्यात येते. पण चारही बाजूंनी येणाऱया वाहतुकीवर नियंत्रण ठेवता येत नाही. परिणामी वाहतूक कोंडी निर्माण होऊन वाहनधारकांना अडकून पडावे लागत आहे.

यामुळे ट्रफिक सिग्नल वाहनधारकांना धोकादायक बनले असून अपघात घडत आहेत. दुरुस्तीसाठी रहदारी पोलिसांनी स्मार्ट सिटी कंपनीकडे तसेच महापालिकेकडे तक्रार केली होती. पण स्मार्ट सिटीने सिग्नलची दुरुस्ती करण्यास नकार दिला आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत ट्रफिक सिग्नल बसविले होते. पण दुरुस्तीची जबाबदारी आपली नसल्याचे सांगून अधिकारी टोलवाटोलवी करीत आहेत. राजेंद्र प्रसाद चौकातील सिग्नल वारंवार नादुरुस्त होत असून दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने महिन्यापासून वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. याचा फटका नागरिकांना बसत असून सिग्नल व्यवस्था दुरुस्त करावी, अशी मागणी होत आहे.

Related Stories

राष्ट्रीय मास्टर्स ऍथलेटीक्स स्पर्धेत धेंडीराम शिंदे, सुरेश देवरमनी यांचे सुयश

Amit Kulkarni

अर्थसंकल्पाबाबत संमिश्र प्रतिक्रिया

Amit Kulkarni

हलगा-तारिहाळमध्ये नवख्यांनाच कौल

Patil_p

‘त्या’ नवजात बालिकेची बेळगाव जिल्हा रुग्णालयात रवानगी

Tousif Mujawar

अवघे शहर लखलखले

Amit Kulkarni

भाषा ही संवाद साधण्याचे महत्त्वाचे माध्यम

Amit Kulkarni
error: Content is protected !!