बेळगाव प्रतिनिधी – रिमझिम कोसळणाऱ्या पावसाच्या सरीमध्येही गुजराती आणि हिंदी गाण्यांवर तरुणाई थिरकली. सरदार मैदानावर सुरू असलेल्या आमदार अनिल बेनके पुरस्कृत दसरा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. पारंपरिक वेशभूषा परिधान करून तरुणाई गरबा व दांडियाचा आनंद घेत आहेत . उत्कृष्ट दांडिया खेळणाऱ्या स्पर्धकाला पारितोषिक दिले जाणार असल्याने रंगतदार स्पर्धा पाहायला मिळत आहे. एकीकडे रिमझिम पाऊस सुरू तर दुसरीकडे तरुणाईचा उत्साह कायम आहे.

