Tarun Bharat

सहाव्या दिवशीही बिबटय़ाचा गुंगारा

Advertisements

वनविभागाकडून शोधमोहीम सुरूच : 22 शाळांना आजही सुटी

प्रतिनिधी /बेळगाव

रेसकोर्स मैदानातील झाडीत शिरलेल्या बिबटय़ाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरूच आहेत. वनविभागाचे 50 हून अधिक कर्मचारी या कामात गुंतले आहेत. बिबटय़ाला पकडण्यासाठी पिंजरे ठेवण्यात आले असून त्याच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी ट्रपकॅमेरे बसविण्यात आले आहेत. सहाव्या दिवशीही वनविभागाला बिबटय़ाने गुंगारा दिला.

शुक्रवार दि. 5 ऑगस्ट रोजी जाधवनगर परिसरात एका गवंडी कामगारांवर हल्ला केल्यानंतर हा बिबटय़ा रेसकोर्स मैदानात शिरला होता. सोमवारी ट्रप कॅमेऱयात बिबटय़ाची छबीही आढळून आली आहे. हनुमाननगर, जाधवनगर, कुवेंपूनगर, क्लब रोड परिसरातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.

वनविभागाच्या अधिकाऱयांचे बिबटय़ाला पकडण्यासाठी प्रयत्न सुरूच आहेत. गेल्या दोन दिवसांपासून हनुमाननगर परिसरातील दुकाने सायंकाळनंतर बंद करण्यात येत आहेत. या परिसरात भाजी, फळ विक्रीबरोबरच खाऊची दुकानेही आहेत. बिबटय़ाच्या धास्तीने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. पोलिसांनी बिबटय़ा रेसकोर्समधून बाहेर पडण्याचा धोका लक्षात घेऊन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

सोमवारपासून रेसकोर्स मैदान परिसरातील शाळांना सुटी देण्यात येत आहे. बुधवारी दिवसभरही वनविभागाचे प्रयत्न सुरू होते. मात्र या प्रयत्नांना यश आले नाही. या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर व ग्रामीण विभागातील 22 शाळांना गुरुवारीही सुटी देण्यात आली आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड यांनी ही माहिती दिली आहे. या परिसरातून अन्य ठिकाणी मुलांना शाळेना पाठविताना काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

या शाळांना आजही सुटी

बेळगाव शहरातील सरकारी प्राथमिक शाळा हनुमाननगर, सरकारी प्राथमिक शाळा कुवेंपूनगर, सरकारी प्राथमिक शाळा सहय़ाद्रीनगर, सरकारी प्राथमिक शाळा सदाशिवनगर, मराठी प्राथमिक शाळा सदाशिवनगर, सरकारी प्राथमिक शाळा  विश्वेश्वरय्यानगर, केएलई इंटरनॅशनल स्कूल कुवेंपूनगर, वनिता इंग्लिश मिडियम स्कूल, केंद्रीय विद्यालय-2, मराठी विद्यानिकेतन, एनपीईटी स्कूल क्लब रोड, सेंट झेवियर्स स्कूल, जीएलपीएस उर्दू स्कूल टी.व्ही. सेंटर या 13 शाळांसह हिंडलगा व विजयनगर येथील 9 शाळांना सुटी देण्यात आली आहे.

Related Stories

माजी कुलगुरु डॉ. एस. जी.देसाई यांचे निधन

Amit Kulkarni

काँग्रेसच्या अपप्रचाराविरुध्द भाजपची मोहीम

Patil_p

लग्न सोहळय़ांच्या परवानगीसाठी तहसीलदार कार्यालयात गर्दी

Amit Kulkarni

अतिवाडात नऊ गवतगंजींना आग

Amit Kulkarni

चौगुलेवाडीतील 16 जणांचे काळजी केंद्रात स्थलांतर

Amit Kulkarni

मोफत दूध घेण्यासाठी धावपळ-गोंधळ

Patil_p
error: Content is protected !!