Tarun Bharat

या भागात सगळं काही उलटंच

छत्तीसगडमधील घडय़ाळं टाकतात गोंधळात

जगभरातील घडय़ाळं तुम्ही पाहिली असतील. परंतु छत्तीसगडमधील एका गावातील घडय़ाळ तुम्हाला गोंधळात टाकतात. या गावाच्या प्रथेनुसार येथे घडय़ाळाचे काटे उलटय़ा दिशेने फिरतात. एवढेच नव्हे तर येथे रात्री 12 वाजल्यानंतर एक नव्हे तर 11 वाजतात.

अँटी क्लॉकवाइज

या गावातील घडय़ाळ अँटी क्लॉकवाइज चालतात. या प्रथेच पालन करणारे गोंड आदिवासी समुदायाचे लोक आपलेच घडय़ाळ योग्यप्रकारे चालत असल्याचे सांगतात. या समुदायाने स्वतःच्या घडय़ाळाला नावही दिले आहे. यांचे घडय़ाळ गेंडवाना टाइम म्हणवून घेते. पृथ्वी उजवीकडून डाव्या दिशेने फिरते. याचबरोबर चंद असो किंवा सूर्य किंवा तारे सर्व याच दिशेने फिरतात असे या लोकांचे मानणे आहे. याचमुळे या समुदायाच्या लोकांनी घडय़ाळाची दिशाच बदलली आहे.

सप्तपदीही घेतात उलट दिशेने

गोंड समुदायाच्या लोकांच्या विवाहाची पद्धतही काहीशी वेगळी आहे. या समुदायात वधूवराच्या सप्तपदी इतर लोकांच्या तुलनेत उलटय़ा दिशेने पूर्ण हातात. या समुदायाचे लोक काही वृक्षांची पूजा करतात. छत्तीसगडच्या या भागात सुमारे 10,000 लोक राहतात.

Related Stories

जेएनयू : सुरक्षेच्या मागणीवर हायकोर्टाची व्हॉट्सऍप, गूगल, पोलिसांना नोटीस

prashant_c

एक दिवस हिजाब घातलेली पंतप्रधान होणार

Patil_p

गुजरातमध्ये टेडी बियर स्फोट, नवविवाहित गंभीर जखमी

Amit Kulkarni

निधन झालेल्या मान्यवरांना विधानसभेत श्रद्धांजली

Patil_p

अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र; केली ‘ही’ विनंती

Tousif Mujawar

कट्टरतावाद्यांसमोर पाकिस्तानने टेकले गुडघे

Patil_p