Tarun Bharat

माजी सभापती स्वप्नाली सावंत यांच्या घातपाताचा संशय

एकजण  पोलिसांच्या ताब्यात ः 2 सप्टेंबरपासून झाल्या बेपत्ता

प्रतिनिधी/ रत्नागिरी

रत्नागिरीच्या माजी पंचायत समिती सभापती स्वप्नाली सुकांत सावंत यांचा घातपात झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आह़े स्वप्नाली सावंत या गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता झाल्या होत्या. त्या संबंधी पती सुकांत सावंत यांनी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली होत़ी दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले आह़े

   शिवसेनेचे पदाधिकारी सुकांत सावंत यांच्या स्वप्नाली सावंत या दुसऱया पत्नी आहेत़ स्वप्नाली यांनी रत्नागिरी पंचायत समितीचे सभापतीपदही भूषवले आह़े मागील काही वर्षापासून स्वप्नाली यांचे कौटुंबिक वाद होत असल्याचे समोर आले होत़े त्या संबंधी स्वप्नाली यांच्याकडून रत्नागिरी शहर पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली होत़ी 2 सप्टेंबर 2022 पासून स्वप्नाली सावंत या आपल्या राहत्या घरातून बेपत्ता झाल्या होत्य़ा अचानक बेपत्ता झाल्याने पती सुकांत सावंत यांनी शहर पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल़ी  

दरम्यान गुरूवारी सायकांळी या संबंधी पोलिसांना महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत़ त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त केला आह़े

 यासंबंधी उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे व शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी हे विविध ठिकाणी कसून तपास करत आहेत़ अद्याप पोलिसांकडून काहीही माहिती देण्यात आलेली नाह़ी स्वप्नाली सावंत यांच्यासंबंधात तपास करण्यासाठी पोलिसांकडून विविध पथके तयार करण्यात आली असून विविध पद्धतीने तपास करण्यात येत आह़े  

   लवकरच या प्रकरणाचा उलघडा होणार

स्वप्नाली सावंत यांच्यासंदर्भात पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आह़े काही महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती आले आहेत़ असे असले तरी आताच याविषयी भाष्य करण्यात करणे योग्य नाह़ी लवकरच या प्रकरणाचा उलघडा होईल़

                        -विनीत चौधरी, शहर पोलीस निरीक्षक

Related Stories

पुण्यातील श्रीकर वर्ल्ड फाऊंडेशनमार्फत पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू

Anuja Kudatarkar

रत्नागिरीत अनधिकृत टपऱया, खोके हटवले!

Patil_p

सालईवाड्यातील राजगुरू पाणंद पालिकेने दुरुस्त करावी – राष्ट्रवादीची मागणी

Anuja Kudatarkar

बांदा-संकेश्वर महामार्ग दोन हजार कोटींचा

NIKHIL_N

मेडिकल कॉलेजसाठी रक्तदान आंदोलन

NIKHIL_N

बांदा नाबर शाळा ते तलाठी कार्यालय पर्यंत गटार बांधकामाचा शुभारंभ

Anuja Kudatarkar