Tarun Bharat

MPSC चा मोठा निर्णय; आता वयोमर्यादेनुसार कितीही वेळा देता येणार परीक्षा

ऑनलाईन टीम/तरुण भारत

एमपीएससीची तयारी करणाऱ्या उमेदवरांसाठी एक मोठी बातमी आणि आनंदाची बातमी आली समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC latest news) पदभरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या कमाल संधींबाबत फेरबदल (no limit of attempt in MPSC now) केला आहे. उमेदवारांच्या कमाल संधींची मर्यादा रद्द करण्याचा निर्णय एमपीएससीने आहे. आता पूर्वीप्रमाणेच उमेदवारांना प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या वयोमर्यादेनुसार परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.

या आधी एमपीएससीने निश्चित केलेल्या वयोमर्यादेत उमेदवाराला कितीही वेळा परीक्षा देण्याची संधी उपलब्ध होती. त्यामुळे अनेकांना मर्यादा संपल्यावर परीक्षा देत येत नव्हते. त्यानंतर इच्छा नसतानाही इतर पर्यायी मार्गांचा स्वीकार करावा लागत असे, आता मात्र तसे होणार नाही. काही वेळेस अपयश आले तरी वयोमर्यादा आहे तोपर्यंत पुन्हा पुन्हा परीक्षा देता येणार आहे. त्यामुळे ही बातमी स्पर्धापरीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा उत्साह नक्कीच वाढवणारी आहे. या निर्णयानंतर विद्यार्थ्यांकडूनही आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोनाकाळात इतर विद्यार्थ्यांसोबतच एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचेही मोठं नुकसान झालं आहे. अनेकवेळा एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्याचे आपण पाहिले आहे. त्यामुळे अनेकांना वयोमर्यादेमुळेही परीक्षा देता आल्या नव्हत्या. तर अनेक विद्यार्थ्यांच्या नियुक्त्याही रखडल्या होत्या. त्यासाठी अनेकदा एसपीएससीचे विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचेही दिसून आले आहे. आता गेल्या दोन वर्षातलं उमेदवारांचं नुकसान भरून काढण्यासाठी एमपीएससी आयोगाकडून तातडीने पाऊलं उचलली जात आहेत. MPSC परीक्षेसाठी आतापर्यंत किती वेळा परीक्षे देता येणार याबद्दल अट ठेवण्यात आली होती. उमेदवारांनी कमाँल मर्यादेत परीक्षा उत्तीर्ण केली नाही तर त्यांना पुन्हा परीक्षा देता येत नव्हती, मात्र MPSC तर्फे आता यात बदल करण्यात आल्यामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Related Stories

उस्मानाबाद जिल्ह्यात सात रुग्णांची भर

Archana Banage

कोरोनाबाधित कामगारांनी ईएसआय योजनांचा लाभ घेण्यासाठी तात्काळ अर्ज करा

Archana Banage

ठाकरेंना धक्का! विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीवर चौधरींऐवजी भुसे आणि सामंतांचा समावेश

Archana Banage

बिहारमध्ये भाजप जदयूची युती तुटली

Archana Banage

फिरायला जा, पण लाख मोलाचा जीव सांभाळा

Patil_p

मी गोमुत्राचा अर्क घेते त्यामुळेच मला कोरोना झाला नाही ; खासदार प्रज्ञा सिंह ठाकुर

Archana Banage