Tarun Bharat

परीक्षा घोटाळाः ज्युनिअर लाईनमनला अटक

प्रतिनिधी/ बेळगाव

केपीटीसीएल परीक्षा घोटाळय़ाप्रकरणी गोकाक पोलिसांनी शनिवारी ज्युनिअर लाईनमनला अटक केली असून परीक्षार्थींना उत्तरे पुरविण्याचे काम त्याने केले आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी ही माहिती दिली आहे. या प्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांची संख्या 14 वर पोहोचली आहे.

गिरीयप्पा उर्फ गिरीश फकिराप्पा बनाज (वय 22, रा. अरभावी) असे त्याचे नाव आहे. शिरहट्टी बी. के. येथे उत्तरे तयार करून परीक्षार्थींना सांगण्यासाठी याने मदत केल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी आणखी काही जणांची धरपकड होणार आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या संशयितांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलीसप्रमुखांनी सांगितले.

शुक्रवारी पोलिसांनी संजीव लक्ष्मण भंडारी (वय 24, मूळचा रा. अरभावी, सध्या रा. घटप्रभा) याला अटक केली आहे. दुसऱया दिवशी गिरीयप्पाला अटक झाली आहे. दि. 7 ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या परीक्षेत मोठय़ा प्रमाणात घोटाळा झाल्याचे उघडकीस आले हाते. कर्नाटकात घडलेल्या पीएसआय परीक्षा घोटाळय़ानंतरचा हा मोठा घोटाळा आहे.

पाच जणांना जामीन नाकारले

परीक्षा घोटाळाप्रकरणी पोलिसांनी यापूर्वी अटक केलेल्या पाच जणांनी बारावे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयात जामीनसाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. सिद्धाप्पा मदिहळ्ळी, सुनील बंगी, सिद्धाप्पा कोट्टल, संतोष मंगावी, रेणूका जवारी यांनी जामीन अर्ज दाखल केला होता.

Related Stories

कंग्राळी खुर्दमध्ये समितीचा बालेकिल्ला अभेद्य

Patil_p

बैलूर परिसरात वळिवाची दमदार

Patil_p

बी.बी.सी.बेकरी यांच्याकडे आता चॉकलेट पानीपुरीला सुरुवात

Amit Kulkarni

दक्षिण विभागीय तायक्वांदो स्पर्धेत राव अकादमीचे यश

Patil_p

बांधकाम कामगारांना दिलेले पॅकेज पुरणार नाही !

Amit Kulkarni

आलखनूर येथील बालक पडले कूपनलिकेत

Patil_p