प्रतिनिधी / बेळगाव : जागतिक दृष्टी दिनानिमित्त दि. 13 ऑक्टोबर रोजी डॉ. कोडकनी सुपरस्पेशालिटी आयसेंटरतर्फे डोळ्यांशी संबंधित समस्या असलेल्या रुग्णांची मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. अयोध्यानगर आणि मारुती गल्ली या दोन्ही शाखांमध्ये या आयोजित शिबिरात एकूण 150 रूग्णांची नेत्र तपासणी व समस्यांबाबत समुपदेशन करण्यात आले.
या वेळी डॉ.शिल्पा कोडकनी, डॉ.आनंद पुराणिकमठ, डॉ.संजय पाच्छापुरे तसेच डॉ.कोडकनी सुपर स्पेशालिटी आय सेंटरच्या सर्व टीम मेंबर्सनी हे शिबीर यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.