Tarun Bharat

परीक्षा घोटाळा; आणखी चौघांना अटक

डीसीआरबी विभागाची सलग दुसऱ्या दिवशीही कारवाई : मायक्रोचीपसह इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस जप्त

प्रतिनिधी /बेळगाव

केपीटीसीएल परीक्षा घोटाळाप्रकरणी डीसीआरबी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणखी चौघा जणांना अटक केली असून त्यांच्याजवळून इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस जप्त करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी याप्रकरणी पाच जणांना अटक झाली होती.

जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी ही माहिती दिली आहे. डीसीआरबी विभागाचे पोलीस उपअधीक्षक वीरेश दोडमनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली असून अद्याप धरपकड सुरूच आहे. 7 ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या केपीटीसीएल ज्युनिअर असिस्टंट परीक्षेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला होता.

इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसचा वापर करून बेळगाव, गदगसह वेगवेगळ्या जिल्ह्यात कॉपी करण्यात आली होती. यासंबंधी गोकाक शहर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आले असून सध्या डीसीआरबीचे पोलीस उपअधीक्षक वीरेश दोडमनी या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

सुधाराणी हुवाप्पा अरभावी (वय 24, रा. उप्पारट्टी, ता. गोकाक), ऐश्वर्या रामचंद्र बागेवाडी (वय 22, रा. तुक्कानट्टी, ता. गोकाक), बसवराज रामाप्पा हावडी (वय 27, रा. बगरनाळ, ता. गोकाक), वैष्णवी बाळाप्पा सनदी (वय 21, रा. मर्डीमठ, ता. गोकाक) अशी अटक करण्यात आलेल्या चौघा जणांची नावे आहेत.

न्यायालयीन कोठडीत रवानगी

अटक करण्यात आलेल्या चौघा जणांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून न्यायालयाच्या आदेशावरून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. 2 जानेवारी रोजी 5 जणांना अटक झाली आहे. पाठोपाठ दुसऱ्यादिवशी आणखी चौघा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मायक्रोचीप, इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस, मोबाईल संच जप्त करण्यात आले आहेत. 

Related Stories

वकिलांच्या ‘त्या’ ठरावाला मनाई नाही

Patil_p

विजापूर जिल्हय़ात भूकंपाचे धक्के

Patil_p

स्वच्छतेत बेळगावला 228 वे स्थान

Patil_p

आदित्य इंजिनियरिंग कंपनीतर्फे गरजूंना जीवनावश्यक साहित्य वितरण

Patil_p

भातकांडे स्कूलच्या स्पर्धेचे बक्षीस वितरण

Patil_p

कोल्हापूर : माथेफिरुकडून महाराष्ट्र एसटी बसवर दगडफेक

Archana Banage