Tarun Bharat

कराडमध्ये पुरातन वस्तूंचे प्रदर्शन

Advertisements

जनसेवा ट्रस्टतर्फे आयोजन; आज शेवटचा दिवस

प्रतिनिधी/ कराड

येथील सोमवार पेठेतील जनसेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सरस्वती उत्सवानिमित्त भारतशास्त्रीय कराड या विषयावर पुरातन वस्तूंचे प्रदर्शन सोमवार पेठेतील विद्यामोहन पूजा हॉलमध्ये आयोजित करण्यात आले आहे. 3 ऑक्टोबरला या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे.

येथील वेदशास्त्री डॉ. विनायक गरूड यांनी गेल्या 16 वर्षात कराड, महाराष्ट्र आणि भारतातील विविध पुरातन वस्तू. नाणी, शस्त्रे, भांडी यांचा संग्रह केला आहे. जनसेवा ट्रस्टच्या माध्यमातून गेल्या चार वर्षांपासून या वस्तूंचा ठेवा प्रदर्शनाच्या माध्यमातून जिज्ञासूंना पाहण्यासाठी खुला केला जातो. यावर्षी सरस्वती उत्सवानिमित्त 29 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान या प्रदर्शनाचे आयोजन सोमवारी पेठेत गरूड मामांच्या वाडय़ासमोर विद्यामोहन पूजा हॉलमध्ये करण्यात आले होते. शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनास भेट देऊन पाहणी केली. मिळालेल्या प्रतिसादामुळे 3 ऑक्टोबरलाही प्रदर्शन सुरू ठेवण्यात येणार आहे.

या प्रदर्शनात विविध नाणी, पुरातन भांडी, शस्त्रे, कराडमधील शिलाहार राजवटीचे नाणे, कराडविषयक माहिती देणारी पुस्तके, पोथी मांडल्या होत्या. कराडविषयी माहिती देणारे फलकही लावण्यात आले होते. अनेक जाणकार नागरिकांनी या प्रदर्शनास भेट देऊन या प्रदर्शनाचे कौतुक केले. यानिमित्ताने राज्याच्या पुरातत्व व वस्तूसंग्रहालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांचे पुरातत्व व महाराष्ट्रातील कातळशिल्पे या विषयावर रविवारी व्याख्यानही आयोजित करण्यात आले होते.

Related Stories

गुंड मनोज मिठापुरे एक वर्षासाठी स्थानबध्द

Patil_p

सोलापूर : माढा तालुक्यातील दोन शासकीय कार्यालयात कोरोनाचा शिरकाव

Archana Banage

मंत्रीपद विस्ताराबाबत एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा, म्हणाले…

Archana Banage

सांगली जिल्हय़ात आज कोरोनाचे चार बळी, नवे 95 रूग्ण

Archana Banage

सातारा : वराडे येथे अँपेरिक्षा ट्रकची धडक ; चालक जागीच ठार

Archana Banage

सातारा जिल्ह्यात 27 जण कोरोना बाधित, 25 जण मुक्त

Archana Banage
error: Content is protected !!