बेळगाव प्रतिनिधी – क्रिएशन फाईन आर्ट्स यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या चित्र प्रदर्शनाचे शनिवारी उद्घाटन करण्यात आले. गोवावेस येथील रॉयल इनफील्ड शोरूमच्या वरील मजल्यावर असणार्या स्टुडिओ आरकॅन येथे प्रदर्शन भरविण्यात आले असून रविवार दि. 2 रोजी सांगता होणार आहे. बेळगावच्या चित्रकार शिल्पा खडकभावी यांनी रेखाटलेली सुंदर चित्रे प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. प्रदर्शनाचे उद्घाटन एस. डी. मलाबादी व जे. व्ही. गणेशगुडी यांच्या हस्ते करण्यात आले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. चित्रकार शिल्पा खडकभावी यांनी चित्रांविषयी माहिती दिली. ऑबस्ट्रॅक्ट पेंटीग प्रकारातील 30 हून अधिक निसर्ग चित्रे त्यांनी रेखाटली आहेत. पहिल्याच दिवशी प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद मिळाला. बेळगाव परीसरातील चित्रकार व कलाप्रेमींनी प्रदर्शनाला भेट देवून चित्रांचे कौतुक केले. सकाळी 11 ते सायंकाळी 7 यावेळेत प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे.
Previous Articleरेल्वे डब्यावर चढलेला तरुण विद्युत तारेला चिकटून होरपळला
Next Article खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी कडाकणी